आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर हर मोदी, घर घर मोदी’च्या गर्जनेत कार्यकर्ते मुंबईकडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ‘हर हर मोदी, घर घर मोदी’च्या गर्जनेत शहरातून सुमारे आठ ते दहा हजार कार्यकर्ते रविवारी (दि. 22) भाजप नेते नरेंद्र मोदींच्या मुंबई येथे होणार्‍या सभेसाठी रेल्वेने शनिवारी रवाना झाले. मॉडेल रेल्वे स्थानकाहून दुपारी 2:10 वाजता
कार्यकर्त्यांची विशेष ‘महागर्जना’ रेल्वे गाडी निघाली.
भाजप कार्यकर्त्यांना घेऊन जाण्यासाठी रेल्वे गाडी मॉडेल स्थानकावरील फ्लॅटफार्म क्रमांक एकवर दुपारी साडेबाराला दाखल झाली. सकाळी 11 पासूनच जिल्ह्याच्या विविध भागांतून कार्यकर्त्यांचे लोंढे रेल्वे स्थानकावर येत होते. गाडी सुटण्याची वेळेपर्यंत कार्यकर्ते गोळा होण्याचा क्रम सुरूच होता.
विदर्भातून आठ विशेष गाड्या
मोदींच्या सभेसाठी विदर्भाच्या विविध जिल्ह्यांतून एकूण आठ विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. नागपूर येथून दोन, तर भंडारा, गोंदिया, वर्धा, बल्लारशा, शेगाव व अकोला स्थानकाहून प्रत्येकी एक विशेष रेल्वे गाडी मुंबईच्या दिशेने रवाना झाली.
महिला आघाडीचा उत्साह
नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी विशेष रेल्वे गाडीने जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्यादेखील मोठय़ा प्रमाणात मुंबईला गेल्या. महिलांसाठी विशेष डब्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. शहर तसेच ग्रामीण भागातील महिला आघाडीच्या पदाधिकारी रॅलीला जाण्यासाठी वेळेपूर्वीच उपस्थित होत्या.