आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिकांच्या खास फर्माईशांवर दिली रफी साहेबांना श्रद्धांजली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- प्रोजेक्टरवर सादर होणारे मोहम्मद रफी यांचे लोकप्रिय गीत, दर्दी श्रोतावर्ग, रसिकांनी तुडुंब भरलेले सभागृह व त्यांच्या खास फर्माईशांवर वाजणारे गाणे.. अशा स्वरसंगीताच्या सुमधुर व बहारदार वातावरणात संगीतातील दिग्गज दिवंगत मोहम्मद रफी यांना नुकतीच श्र द्धांजली अर्पण करण्यात आली. खुद्द रफी साहेब मंचावरून आपल्या गीताचे सादरीकरण करीत असल्याचा अनुभव आल्याच्या प्रतिक्रिया रसिकांनी दिल्या. सुमधुर आवाजाने विनायक सभागृहदेखील दणाणून गेला होता.
‘खोया खोया चाँद’, ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियों’, ‘जाने कहाँ मेरा जिगर गया जी,’ तसेच ‘यह दिल मुश्किल जिना यहाँ’ असे एकाहून एक लोकप्रिय गीतांचे सादरीकरण करून रफी यांना श्र द्धांजली वाहण्यात आली. दरवेळी रेडिओ प्रोजेक्टरवर सत्तरीच्या दशकातील गाण्यांचे सादरीकरण करण्यात येते. त्यावर श्रोतावर्ग हा शांततेत गीतांचा आनंद लुटत असतो. मात्र, या वेळी रसिकांच्या खास फर्माईशांवर गीतांचे सादरीकरण पडद्यावर झाल्याने रफीसाहेबांना जवळून बघण्याचा आनंद श्र ोत्यांनी घेतला.
31 जुलै 1980 रोजी मोहम्मद रफी संगीताच्या दुनियेतून निघून गेले; पण रफींचा आवाज आजही रसिकांच्या कानात गुंजत आहे. या घटनेला 34 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे रफीसाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या लोकप्रिय गीतांचे सादरीकरण करून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. श्रोत्यांनी कार्यक्रमात गीतांच्या फर्माईशांचे पडद्यावर सादर करत रफी यांना श्र द्धांजली अर्पण केली. रामप्रसाद भंडारी यांनी हा कार्यक्रम सादर केला. मोहम्मद रफी यांच्या स्मृतीला रसिकांच्या आवडीच्या गाण्यांनी श्रद्धांजली देऊन हा कार्यक्रम अधिक बहारदार करण्यात आला. रफीसाहेबांना श्रद्धांजली म्हणून सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर्सच्या वतीने नुकतेच विनायक सभागृहात रफी यांच्या लोकप्रिय गीतांच्या संगीयमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने मोहम्मद रफी यांच्या सुवर्णकाळातील लोकप्रिय गीतांच्या फर्माईश कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असल्याने संपूर्ण सभागृह श्रोत्यांनी खचाखच भरला होता.