आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mohan Khedkar News In Marathi, Vice Chancellor,Amravati University

कुलगुरू खेडकरांना क्लीन चिट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - कन्या मृणाल खेडकर हिच्या कथित गुणवाढ प्रकरणानंतर अडचणीत आलेले आणि सहा महिन्यांपासून प्रदीर्घ रजेवर पाठवण्यात आलेले कुलगुरू डॉ. मोहन खेडकर यांच्यासह अनेकांना या प्रकरणातून निर्दोष मुक्तता मिळणार आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या 32/6 समितीने शुक्रवारी (दि. 6) परीक्षा मंडळाच्या बैठकीत अहवाल सादर केला.

राज्यपालनामित व्यवस्थापन समिती सदस्य डॉ. संतोष ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मोहम्मद समीउल्ला, डॉ. ए. व्ही. चांदेवार, डॉ. पी. डब्ल्यू. काळे, विद्याभारतीचे प्राचार्य तथा विद्यापीठाचे विज्ञान अधिष्ठाता डॉ. एफ. सी. रघुवंशी यांचा समावेश असलेल्या पाच सदस्यीय चौकशी समितीने सुमारे सहा महिने जंग-जंग पछाडून केलेल्या चौकशीत काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे कुलगुरू डॉ. मोहन खेडकर यांच्यासह अनेकांना या प्रकरणात निदरेष ठरवण्यात आले आहे. आता हा अहवाल लवकरच राज्यपाल तथा कुलपती के. शंकरनारायणन यांना सादर होणार आहे. सुमारे सहा महिन्यांपासून सक्तीच्या रजेवर असलेले डॉ. मोहन खेडकर यांना राज्यपाल रुजू करून घेण्याची शक्यता आहे.
डॉ. खेडकर परतणार : सहा महिन्यांच्या प्रदीर्घ रजेनंतर आता डॉ. मोहन खेडकर यांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला आहे. याच समितीच्या अहवालासाठी राज्यपाल डॉ. खेडकर यांना रुजू करून घेत नव्हते. प्राचार्य डॉ. एफ. सी. रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने डॉ. खेडकर यांच्यासह अनेकांना दोषी ठरवले आहे. तो अहवाल सिनेटने फेटाळला आहे. 32/6 समितीने कुणीही दोषी आढळत नसल्याचा अहवाल दिला आहे. त्यातच सिनेटमध्ये डॉ. खेडकर यांना पदावरून हटवण्याबाबत डिसेन्टवरही राज्यपालांना निर्णय घ्यायचा आहे.

गुणवाढीचे ठोस पुरावे नाहीत : कुलगुरुकन्या मृणाल हिचे गुण चुकीच्या पद्धतीने किंवा अधिकाराचा गैरवापर करून वाढवल्याचे कोणतेही ठोस पुरावे चौकशी समितीला आढळले नाही.
>‘दिव्य मराठी’चा पाठपुरावा : सुमारे सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या मॅरेथॉन चौकशीवर ‘दिव्य मराठी’ पदोपदी लक्ष ठेवून होते. चौकशीत काहीच आढळत नाही म्हणून कुलगुरू डॉ. खेडकर, तत्कालीन परीक्षा नियंत्रक नितीन कोळी यांनाही आरोपीच्या पिंजर्‍यता उभे करून साक्षीसाठी बोलावण्यात येणार होते. सुमारे दोन महिन्यांपूर्वीच ‘दिव्य मराठी’ला या प्रकरणातून काहीच निष्पन्न होणार नाही, असे ठामपणे कळले होते. परंतु, चौकशीच्या कार्यवाहीत अडथळा नको म्हणून जाणीवपूर्वक असे वृत्त देण्याचे ‘दिव्य मराठी’ने टाळले. त्याऐवजी मॅरेथॉन चौकशी कशासाठी सुरू आहे, अशा आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते.

असे आरोप, असा निष्कर्ष
ए.एल. घोम, सहायक कुलसचिव (गोपनीय)
* आरोप : चुकीच्या पद्धतीने मृणालला पेपर दाखवले. विद्यार्थ्यांना पेपर दाखवण्याची तरतूद नसतानाही केले कृत्य.
- आढळले : ठोस पुरावा आढळला नाही.
पी. के. देशमुख, मुख्य मूल्यांकन अधिकारी
*आरोप : मूल्यांकन पद्धतीवर अयोग्य देखरेख.
- आढळले : कोणताही ठोस पुरावा नाही.
प्रा. संजय डुडूल, विभागप्रमुख, अँप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स
* आरोप : पात्रता नसतानाही पेपरचे मूल्यांकन केले.
- आढळले : गुण वाढवल्याचे सिद्ध होत नाही.