आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहितच्या फिरकीपुढे ‘ब्रदरहूड’ची शरणागती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राईटआर्म लेग स्पिन गोलंदाज मोहित कुमारने धारदार मारा करून मिळवलेल्या पाच बळींच्या आधारे अमरावती महाबँक संघाने गझदर ‘क’ डिव्हिजन क्रिकेटलीग अंतर्गत झालेल्या साखळी सामन्यात वर्धा येथील ब्रदरहूड क्रिकेट क्लबचा दोन गड्यांनी पराभव करून तिस-याविजयाची नोंद केली.

विदर्भक्रिकेट संघटनेतर्फे नागपुरात सुरू असलेल्या या लीगमधील चार सामन्यांमध्ये अमरावतीच्या महाबँक संघाचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे संघाचा आत्मविश्वास
बळावला आहे. त्यामुळेच सांघिक कामगिरीच्या बळावर ब्रदरहूडने दिलेल्या १८३ धावांच्याविजयी आव्हानाचा पाठलाग महाबँक संघाने ४० षटकात फलंदाज गमावून केला. अमरावतीच्या संघाने १८६ धावा उभारूनविजय साकारला. चार फलंदाजांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे महाबँकेला या सामन्यात यशमिळाले. अंकुश नवलकरने नाबाद ३७ धावांच्या खेळीत सहा चौकार खेचून संघाची डळमळणारी नौका तीराला लावली. त्याआधी नीतेश शमार्ने तीन चौकार एका उत्तुंग षटकाराह ३८ धावा ठोकल्या. करण नरोडेने चार चौकारांसह २९ धावांची खेळी केली तर जतीन किरीने चार सीमापार फटक्यांसह २६ धावांचे योगदानदिले. ब्रदरहुडच्या गोलंदाजांना सूर गवसला नाही. कार्तिक दातेने ३८धावांत दोन तर हर्षल हुद्दारने २८ धावांत एक फलंदाज टीपला. महाबँकेचे उर्वरित फलंदाज ताळमेळाच्या अभावामुळे धावबाद झाले.

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून फलंदाजीस आलेल्या ब्रदरहूड क्लबने चांगली सुरुवात केली. शुभम रामटेकेने सात चौकार दोन गगनचुंबी षटकारांसह ७७ धावांची वेगवान आक्रमक अर्धशतकी खेळी करून सामन्यात रंग भरला. दुस-या बाजूने मोहित कुमारच्या लेग स्पिन मा-याने कहर सुरू ठेवल्यामुळे या संघाला अपेक्षित धावसंख्या काढता आली नाही. मोहितने षटकात एक निर्धाव टाकून ४० धावांच्या मोबदल्यात पाच फलंदाजांची शिकार करून ब्रदरहूडची फलंदाजी खिळखिळी केली. पराग गांधीने २७ धावांत दोन फलंदाजांना परतीची वाट दाखवली.