आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीसह राज्य अन् देशभरात ठिकठिकाणी मान्सून ट्रेकिंगचे आयोजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मृगनक्षात्रा पहिल्या दिवशी सात जून रोजी पावसाला सुरुवात झाली अन् शेतकऱ्यांसोबतच ट्रेकर्सलाही आनंद झाला. आता ट्रेकिंगसाठी वाट बघावी लागणार नाही, याचेच सर्वांना समाधान होते. दररोज पाऊस हजेरी लावत असल्यामुळे वातावरणात हवा-हवासा गारवा अन् रंग हिरवा पसरला आहे. त्यामुळे अमरावतीसह राज्य आणि देशभरातच जंगल, रॉक , डेझर्ट, फोर्ट अशा विविध प्रकारच्या ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आले आहे.
पावसाचे तुषार अंगावर झेलत कितीही पायी फिरले तरी थकवा येत नाही. त्यामुळे हा हिरवा ऋतू ट्रेकर्ससाठी पर्वणीच असते. नुकतेच अमरावतीच ट्रेकर्स युथ होस्टेलच्या ट्रेकिंग अंतर्गत नरनाळा किल्ल्यावर ट्रेकिंग केले. ढगाळ वातावरण, मध्येच कोसळणारा पाऊस, गारवा अशा वातावरणात अंबानगरीच्या ट्रेकर्सने आनंदात हा साहसी उपक्रम पूर्ण केला.

अशाच प्रकारच्या ट्रेकिंगचे आयोजन निसर्गरम् चिखलदरा भागातही दरवर्षी होत असते. गेल्या काही वर्षांपासून राज्य देशभरातच ट्रेकिंग आयोजनांची संख्या वाढली कारण पावसातील ट्रेकिंगला अगदी भरघोस प्रतिसाद मिळत असतो. सृष्टीची विविध रूपे अगदी जवळून बघता येतात. गवताची जमिनीच पोटातून वर येणारी पाती, पाण्याने धुतली गेल्यामुळे स्वच्छ झालेली कंच हिरवी पाने, मनाला आल्हाद देणारी शुद्ध हवा, हिरव्या टेकड्या पर्वतांच्या रांगा साहजिकच ट्रेकर्सला साद घालत असतात. त्यामुळे हा काळ देशातील ट्रेकर्ससाठी विशेष संधी असते. यासाठी बहुतेक जण मुद्दाम उन्हाळ्यात सुट्या घेत नाहीत. त्या वाचवून पावसाळ्यात ट्रेकिंगच्या वेळी त्यांचा उपयोग केला जातो.

आरोग्य,आल्हाद मिळतो
शुद्धवातावरणात पायी फिरल्याने शरीराला नवा तजेला मळतो. थकवा नाहीसा होऊन आल्हाददायक हलके वाटते. मनात येईल तेव्हा भटकंती अन् विसावा घेता येतो, कारण ट्रेकिंगमध्ये कोणतेही बंधन नसते. त्यामुळेच ट्रेकिंगला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दडपणरहित वातावरणात फिरण्याने आरोग्य लाभही होतो.

थंड झरे, गार पाण्यातून चालण्याची मजा औरच
पावसाळ्यात झरेही वाहायला लागतात. जागोजागी पाण्याचे ओहळ दिसतात. त्यातून चालताना फारच मजा येते. यासाठी पायात चांगले शूज, सुरक्षित ट्रेकिंग करून घेणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. पाण्यातून फिरताना जर काही नियम पाळले तर हा वेगळाच आनंद असतो. त्यामुळे वेगळे काहीतरी करण्याची हौस असणारे, भर पावसाळ्यात ट्रेकिंगवर जातात, अशी माहिती युथ होस्टेल, अमरावती शाखेने दिली.

काही ट्रेकिंग आयोजने
महाबळेश्वर,कोंकण,विदर्भातील विविध ठिकाणांसोबतच अमरावती जिल्ह्यातीलज निसर्गरम्य स्थळी काही दिवसांत मान्सून ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या ट्रेकिंग उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आनंद िद्वगुणित करण्यासाठी साहसी पर्यटनाची आवड असलेल्यांमध्ये होड लागली आहे.
ट्रेकर्स निघाले जंगल, रॉक, फोर्ट सफारीला
आवड तरुणाईची
बातम्या आणखी आहेत...