अमरावती - पंढरीच्या वारीसाठी जिल्ह्यातील आठ आगारांमधून 65 विशेष बस सोडण्यात येणार आहेत. पाच ते 15 जुलै दरम्यान हरिभक्तांसाठी विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे, असे विभागीय परिवहन कार्यालयातून कळवण्यात आले.
दरम्यान, अमरावती आगारातून भक्तांची संख्या अधिक असल्याने आगारातून सर्वाधिक 22 बसगाड्यांचे नियोजन आहे, असे वाहतूक अधिकारी यांनी सांगितले. भक्तांचा प्रतिसाद व गर्दी वाढल्यास वेळेवर जादा बसफे-या सोडण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. तथापि, पंढरपूरसाठी गाड्यांची वेळ ठरवण्यात आली नसून, 24 तासांत बस केव्हाही भरल्यास सोडण्यात येईल, असे त्यांना सांगितले. दरम्यान, प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रत्येक आगारातील अधिकारी यादरम्यान तैनात राहणार आहेत.
गर्दी बघता जादा गाड्या
पंढरपूरसाठी यंदा 65 गाड्यांचे नियोजन आहे. प्रवाशांची गर्दी असल्यास जादा गाड्या सोडण्यात येतील. शिवाय 50 प्रवाशांचा गट असल्यास गाव तेथून बसची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांची सुविधा सर्वोच्च् आहे. आर. एन. पाटील,विभागीय वाहतूक अधिकारी