आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात कपाशीची पेरणी सर्वाधिक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र - Divya Marathi
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र
अमरावती- जिल्ह्यात समाधानकारक पावसामुळे पेरण्यांना वेग आला असून आतापर्यंत १९ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. यात सर्वाधिक टक्के पेरण्या कपाशीच्या असल्यामुळे यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात मागील आठवड्यात पेरणीयोग्य समाधानकारक पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे अद्यापपर्यंत पेरण्या रखडल्या होत्या. दरम्यान, दोन-तीन दिवसांपासून पावसाने उघाड दिल्यामुळे जिल्ह्यात पेरण्यांना वेग आला आहे. सातत्याने दोन वर्ष कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जबर फटका बसल्याने कपाशीचे क्षेत्र घटण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु आतापर्यंत झालेल्या १९ टक्के पेरण्यांमध्ये टक्के क्षेत्र कपाशीचे असून सात टक्के सोयाबीन तर टक्के तुरीचे क्षेत्र आहे. उर्वरित क्षेत्रावर धान, ज्वारी, मका, मुग, उडीद, भुईमूग आदी पिकांच्या पेरण्या करण्यात आल्या आहेत.
कपाशीची सर्वाधिक पेरणी २४ हजार हेक्टर वर वरुड तालुक्यात करण्यात आली आहे. त्या खालोखाल अचलपूर तालुक्यात ११ हजार ५०० हेक्टर तर धामणगाव रेल्वे तालुक्यात सात हजार ७०३ हेक्टरवर कपाशीची पेरणी करण्यात आली आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र सध्या सर्वाधिक आहे. तालुक्यात ७,३२६ हेक्टर, धारणी ६७०० हे., चांदुर बाजार ५३५७ हे., अमरावती तालुक्यात ३५७४ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे.
पेरण्यावेळेवर परंतु... :जिल्ह्यातपेरणी योग्य पाऊस आल्यामुळे पेरण्यांना वेग आला असला मागील दोन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. आणखी दोन चार दिवसांत पाऊस बरल्यास शेतकऱ्यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. बहुंताश शेतकऱ्यांनी आज ऊन तापल्यामुळे पेरण्या झालेल्या शेतात सिंचन सुरू केले आहे.

७% सोयाबीन २% तूर
पेरणीयोग्य एकूण क्षेत्र - ७,१४,९५० हे.
पेरणी झालेले क्षेत्र - १,२५,००४ हे.
१९% पेरण्या आटोपल्या %कपाशी
बातम्या आणखी आहेत...