आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mother Father Arrested In Case Of Child Marriage

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलीचा बालविवाह केल्याप्रकरणी आईवडिलांना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातीलएका अल्पवयीन मुलीचे तिच्या इच्छेविरुद्ध परप्रांतात लग्न लावून देणा-या सावत्र आईवडिलांसह एकूण पाच जणांविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हे दाखल करून तूर्तास तिघांना अटक केली. यात आईवडिलांसह परतवाडा येथील लग्न लावणा-या एका महाराजचाही समावेश आहे. या तिघांची सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

साडेसतरा वर्षांच्या एका मुलीचे तिच्या सावत्र आई-वडिलांनी नोव्हेंबर २०१४ मध्ये इच्छेविरुद्ध लग्न लावून दिल्याची तक्रार मुलीने पोलिसांत दिली आहे. मुलीच्या वडिलांचा परिचित असलेला एक व्यक्ती राजस्थानमधील कोटा येथे राहतो. त्याच्या माध्यमातून त्यांनी मध्य प्रदेशातील एका युवकासोबत मुलीचा विवाह ठरवला.

हा विवाह सोहळा कोटा येथे पार पडला. या वेळी परतवाडा येथील पवन गिरिजाशंकर मिश्रा यांनी हे लग्न लावून दिले होते. विवाह पार पडल्यानंतर ती मुलगी पतीसोबत मध्य प्रदेशात गेली. तेथे गेल्यानंतर तिने मला परीक्षेचा अर्ज भरायचा आहे, त्यासाठी अमरावतीला यायचे आहे, असे अमरावतीत राहणा-या आई-वडिलांना फोन करून सांगितले. त्यामुळे आई-वडिलांनी मध्य प्रदेशात जाऊन तिला अमरावतीत परत आणले. अमरावतीत आल्यानंतर काही दिवस ती घरी थांबली नंतर घरातून निघून गेली. आई वडिलांनी शोध घेतला असता ती दिसली नाही, त्यामुळे त्यांनी महिनाभरापूर्वी शहरातील फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

दुसरीकडे मुलीचा शोध सुरू असताना ही मुलगी मुंबईत मिळाली. मुंबई पोलिसांनी अमरावती बालगृहाशी संपर्क करून या मुलीला बालगृहात पाठवले. बालगृहातून आलेल्या माहितीची फ्रेजरपुरा पोलिसांनी तातडीने दखल घेऊन प्रकरणाची चौकशी सुरू केली. आई वडिलांनी इच्छेविरुद्ध लग्न लावून दिल्याचे मुलीने महिला पोलिस अधिका-यांना चौकशीदरम्यान सांगितले. त्यामुळे फेब्रुवारी २०१५ रोजी पोलिसांनी मुलीच्या आईवडिलांसह तिच्यासोबत लग्न करणारा व्यक्ती, लग्न लावून देणारा महाराज, कोटा येथील मध्यस्थी अशा पाच जणांविरुद्ध ९, १०, ११ बालविवाह प्रतिबंधक अधिनियमान्वये तसेच बालकांचा लैंगिक अत्याचार कलम (पोस्को) अन्वये गुन्हा दाखल केला. त्याच दिवशी पोलिसांनी आई-वडिलांना अटक केली. तसेच महाराज पवन मिश्रालासुद्धा अटक केली आहे. या तिघांना फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस मध्य प्रदेश राजस्थानात जाण्याची शक्यता आहे.