आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Movement 'pamthara' Black Screen Behind; Maharashtra Lost The Big Kawila

चळवळीचा ‘पँथर’ हरपला; महाराष्ट्र महाकवीला मुकला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- ‘पँथर’चे प्रणेते तथा विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांचे नुकतेच निधन झाल्याने विविध सामाजिक संघटना, साहित्यिक मंडळी, शाळा, महाविद्यालयांच्या वतीने त्यांना विनम्र र्शद्धांजली अर्पण करण्यात आली.

दलित पँथर : इर्विन चौकातील डॉ.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दलित पँथरच्या वतीने नामदेव ढसाळ यांना र्शद्धांजली वाहण्यात आली. त्यामध्ये पँथरचे बाळासाहेब मेर्शाम, प्रभाकर घोडेस्वार, रामू पछेल, डी. एस. रूपनारायण, केवलदास वाहाने, अशोक गजभिये, मनोहरराव बारसे, मनोहरराव घोडेस्वार, प्रल्हाद रंगारी, नाना रमतकार, प्रकाश डोंगरे, चंदाबाई बारसे, प्रतिभा अभ्यंकर, संजय भोवते, राजू पळसापुरे, त्र्यंबक ढोके, गजानन फुले, रामदास कुसरे, पंकज मेर्शाम, दीपक शेजव, कुणाल गोसावी, गुलाबराव राठोड, आप्पाजी दहाटे आदी शेकडो कार्यकर्त्यांनी र्शद्धांजली वाहिली.

संत गाडगे महाराज महाविद्यालय :

वलगाव येथील संत गाडगे महाराज महाविद्यालयामध्ये गुरुवारी (दि. 16) नामदेव ढसाळ यांना र्शद्धांजली वाहण्यात आली. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे पथक आणि मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी प्रा. पी. यू. जवंजाळ अध्यक्षस्थानी होते. ढसाळांविषयी आपल्या भावना व्यक्त करताना प्रा. जवंजाळ म्हणाले, ढसाळ हे कवीच नव्हते, तर दलित पँथरची स्थापना करून ते दलित चळवळीतही सक्रिय होते. साहित्यातील ‘पँथर’ हरवल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. डॉ. माधुरी भटकर, प्रा. डी. आर. यावले, प्रा. पुष्पा बनकर यांनीही शोकसंवेदना व्यक्त केल्या. यानंतर दोन मिनिटे मौन बाळगून नामदेव ढसाळ यांना र्शद्धांजली वाहण्यात आली. या वेळी प्रा. अरविंद जोशी, प्रा. शंकर चव्हाण, प्रा. प्रिया खोरगडे, प्रा. डॉ. मनीषा ईसापुरे, प्रा. सुनील केदार आदींची उपस्थिती होती.

नालंदा बुद्धविहारात शोकसभा :

साईनगर परिसरातील नालंदा बुद्धविहारामध्ये नुकतीच नालंदा परिवारातर्फे शोकसभा घेऊन विद्राही कवी नामदेव ढसाळ यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. सुशीला मेर्शाम सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. याप्रसंगी रेखा टेंभुर्णे, रोहिणी आहटे आदी मान्यवरांनी आपल्या भाषणांतून ढसाळ यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली असल्याची खंत व्यक्त केली. मातोर्शी रमाई महिला मंडळाच्या अध्यक्ष वंदना चवरे, कुंजलता गेडाम, मंदा मेर्शाम यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा नागदिवे, तर जयमाला रामटेके यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय अध्ययन मंच व मातोर्शी रमाई महिला मंडळाच कार्यकर्त्यांसह नालंदा परिवाराचे सदस्य मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

ब्ल्यू टायगर फोर्स :

आंबेडकरी चळवळीतील दलित पँथरचे नेते नामदेव ढसाळ यांना ब्ल्यू टायगर फोर्स या संघटनेच्या वतीने दोन मिनिटे मौन बाळगून र्शद्धांजली अर्पण केली. ब्ल्यू टायगर फोर्सचे संस्थापक-अध्यक्ष अँड. सुधीर तायडे यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमादरम्यान, नामदेव ढसाळ यांचा जीवनपट, चळवळीतील योगदान आणि त्यांच्या विद्रोही साहित्याबद्दल अँड. तायडे यांनी माहिती दिली. तसेच त्यांचा नावाचा जयघोष करण्यात आला. कार्यक्रमाला र्शावण दातार, निळकंठ माटे, पवन कुडमेथे, अँड. अश्विन धंदर, भगवान इंगळे, वामन लांडगे, नरेंद्र बिजावार, विक्रांत डोंगरे, आर. एम. झटाले, उद्धवराव सोनोने, अँड. बी. वाय दाभाडे, स्वप्नील येसांबरे, भारत दुर्योधन, गजानन चोरपगार आदी नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.