आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mrunal Kulkarni Communicate With Student At Amravati

मृणाल कुळकर्णी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, रायसोनी युवा महोत्सवाचे उद््घाटन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - आपले शिक्षण कोणत्याही क्षेत्रातील असो करियर मात्र विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्रातच घडवावे. विदर्भातील मातीत खरोखर दम आहे. आपल्या संस्कृतीचा वारसा जपून अमरावतीकरांनी जगभर नावलौकीक मिळवावे, असा प्रेमळ सल्ला प्रसिद्ध सिनेअभिनेत्री मृणाल कुळकर्णी यांनी दिला. रायसोनी युवा महोत्सवाचे बुधवारी (दि. २८) मृणाल यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी खास वऱ्हाडी बोलीत संवाद साधला. जिल्हाधिकारी किरण गित्ते पोलिस आयुक्त डॉ. सुरेशकुमार मेकला यांचीही या वेळी उपस्थिती होती.

तरूणाईचा जल्लोष अन् टाळ्यांच्या कडकडाटात महोत्सवाचे उद्घाटन झाले. मृणाल कुळकर्णी यांना पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांना शांतपणे ऐकूणही घेतले. तर, तरूण तरूणी देशाचे खरे भविष्य आहे. देशाला कोठे पोहचवायचे हे त्यांच्यावर अवलंबून आहे. असे मत डॉ. मेकला यांनी व्यक्त केले. मात्र सोशल मिडीयाच्या अति वापरात वेळ शक्ती वाया घालवत असल्याबद्दल खंत व्यक्त करत या माध्यमांचा भान ठेऊन मर्यादीत वापर करावा असा सल्ला दिला. अध्यक्षीय भाषणात जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत इंगोले म्हणाले की, आज युवाशक्तीला योग्य दिशा देणे हे सर्वांचे ध्येय असले पाहिजे. तेव्हाच आपण "मेक इन इंडिया' ही संकल्पना साकारू शकतो. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी हा महोत्सव घेण्यात येत असल्याचे संयोजक प्रा. नितीन मांडवगडे यांनी सोहळ्याच्या प्रास्ताविकात सांगितले. रायसोनी मॅनेजमंेट ऑफ इन्स्टिट्युटच्या संचालक डॉ. पल्लवी मांडवगडे, नागपूर येथील राजीव चांद यांचीही यावेळी प्रामुख्याने उपस्थित होती. प्रा. स्नेहल जयस्वाल यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. रायसोनी तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रवीणकुमार वानखडे यांनी आभार मानले. ज्योती तोटेवार यांनी सुत्रसंचालन केले. पसायदानाने सांगता झाली.

सामाजिक बांधिलकी जपा - जिल्हाधिकारी
ज्यासमाजाने आपल्याला घडवले आहे त्या समाजाप्रती सामाजिक बांधिलकी कायम ठेवा असे मत जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी व्यक्त केले. ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. करीयर निवडताना आपली आवड, आपल्याला मिळणारे समाधान, सामाजिक भान या बाबींचा विचार करावा तेव्हाच आपले आयुष्य आनंदी होऊ शकते असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. कॉलेजमधील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका असेही ते म्हणाले.