आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीकडे यमदूताची बस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - जिल्ह्यात एसटीचे आठ विभाग आहेत. या विभागांसाठी 447 बस आहे. यापैकी सर्वाधिक 71 बस अमरावती, परतवाडा 70, बडनेरा 40, मोर्शी 46, चांदूररेल्वे 42, वरूड 49, दर्यापूर 52 आणि चांदूरबाजार विभागात 45 गाड्या धावत आहेत. त्यापैकी आठ बस स्क्रॅप झाल्या असल्या तरी अद्याप रस्त्यावर धावतात, अशी माहिती एसटीच्याच अधिकार्‍यांनी दिली आहे. एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी विविध योजना राबवल्या जातात. इतर वाहतूक यंत्रणांच्या तुलनेत प्रवाशांचा एसटीवर अधिक विश्वास आहे. मात्र, प्रवाशांच्या या विश्वासाला तडा बसत असून, खराब अवस्थेतेतील बसमधून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.

लांब पल्ल्याच्या प्रवासावर चालणार्‍या अनेक बसचीदेखील दयनीय अवस्था असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

चालकही झाले हतबल : अनेक बसची दुरवस्था झाली असली तरी नोकरीसाठी चालकांना जीव धोक्यात घालून खराब एसटी चालवाव्या लागत आहेत. लांबपल्ल्याच्या बसमध्ये चालकांना अपेक्षित सोयी-सुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीत. अशा भंगार बस चालवताना चालकही हतबल झाले आहेत.

परतवाड्याचे आगार प्रमुख निलंबित : परवाडावरून अमरावतीला येणार्‍या बसला बुधवारी अपघात झाला होता. या अपघातात चालकासह दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याने परतवाडा आगार प्रमुखांना निलंबित करण्यात आले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी ही कारवाई केली आहे. बसचे टायर खराब असल्याने अपघात झाला होता.