आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती एमटीडीसी कार्यालयाचा मुद्दा अद्यापही अधांतरीच

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) कार्यालयाचा मुद्दा अजूनही अधांतरीच आहे. विपुल निसर्गसौंदर्य असतानाही अमरावती जिल्ह्यात एमटीडीसीचे कार्यालय नाही. ही बाब त्वरेने बदलावी, यासाठी महसूल प्रशासनाने पुढाकार घेतला होता; परंतु औपचारिकता पूर्ण न केल्यामुळे अद्यापही ती उणीव कायम आहे.

नवी व्यवस्था होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवनाचा एक भाग एमटीडीसीसाठी देण्याचा निर्णय झाला होता. परंतु नवीनीकरणानंतर पूर्णत्वास गेलेल्या बचत भवनाला अजूनही त्या कार्यालयाची प्रतीक्षा आहे. महसूल विभागाने भरीव मदतीचा हात पुढे केला असला, तरी पर्यटन विभागच बोलायला तयार नाही, अशी सध्याची स्थिती आहे. ठरलेल्या वेळापत्रकानुसार गेल्या महिन्यातच हे कार्यालय सुरू होणार होते, तसे न झाल्यामुळे पर्यटनप्रेमींची नाराजी मात्र कायम आहे. राज्याचे मुख्य सचिव जयंत बांठिया मेळघाट दौर्‍यावर आले असताना हा मुद्दा प्रकर्षाने जाणवली.

काय आहे सध्याची व्यवस्था ?
मेळघाट असो की विदर्भातील कोणतेही पर्यटनस्थळ, सध्या नागपूर येथील कार्यालयातून औपचारिकता पूर्ण करावी लागते. इंटरनेटच्या माध्यमातून कुणी कोठूनही संपर्क करू शकतो, वेगवेगळ्या पद्धतींचे आरक्षण करू शकतो, असे सांगून पर्यटन विभाग पर्यटकांची बोळवण करीत आहे. हे चित्र बदलायला पाहिजे, अशी अनेकांची मागणी आहे.