आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेने तोडली झोपडी; घरमालकाने घेतले विष, नवसारी परिसरातील उज्ज्वलउ कॉलनीमध्ये घडली घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरातील नवसारी परिसरातील उज्ज्वल कॉलनीमध्ये एक कुटुंब मागील १८ वर्षांपासून टिनाची झोपडी बांधून राहत होते. ही झोपडी शासकीय जागेत असल्याने बुधवारी महापालिकेने अतिक्रमणाची कारवाई करत झोपडी जमीनदोस्त केली. आपला निवाराच गेला, आता कुटुंबासह राहायचे कुठे, या विवंचनेत घरमालकाने त्याच ठिकाणी बुधवारी दुपारी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
अनिल अंबादास पैठणकर (४७ रा. उज्ज्वल कॉलनी) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या झोपडीमालकाचे नाव आहे. मजुरी करून ते कुटंुबाचा उदरनिर्वाह चालवतात. अनिल पैठणकर हे १९९६ पासून उज्ज्वल कॉलनीमध्ये टिनाची झोपडी उभारून राहत होते. झोपडीची ही जागा शासकीय होती. दरम्यान, सध्या शहरातील विविध भागांतील अतिक्रमण काढण्याची पालिकेची मोहीम सुरू आहे. बुधवारी महापालिकेचे अतिक्रमण पथक, पोलिस उज्वलनगर परिसरात पोहचले. दुपारची वेळ असल्यामुळे अनिल पैठनकर, त्यांच्या पत्नी रेखा मुलगा आकाश हे तिघेही कामासाठी घराबाहेर गेले होते. याच वेळी अतिक्रमण पथकाने पैठनकर यांच्या तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या राहत्या झोपडीवर कारवाई सुरू केली. सदर झोपडीची जागा ही सर्व्हीस गल्लीची शासकिय असल्याचे सांगून महापािलकेने ही झोपडी जमिनदोस्त केली. आपल्या घरावर महापािलकेने कारवाई केली ही माहीती मिळताच पैठनकर तातडीने आपल्या झोपडीजवळ पोहचले.

त्यांनी पाहीले कि, आपल्या झोपडीतील सर्व साहीत्य निस्तनाभूत झालेले आहे, काम करण्यासाठी आवश्यक असलेले साहीत्य, कपडे, संसारपयोगी साहीत्य, धान्य हे सर्वच रस्त्यावर आले आहे. राहते घर गेले, आता राहायचे कसे, कुटूंबाचे काय होईल, याच विवंचनेत त्यांनी त्याच ठिकाणी विषाची बॉटल घेतली विष प्राशन केले. यावेळी परिसरात असलेल्या पोलिसांनी नागरीकांनी पैठनकर यांना इर्विन रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दुसरीकडे अनिल पैठनकर यांच्याविरुध्द आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नोटीस दिलीच नाही
१९९६पासून आम्ही झोपडीत राहत होतो. आम्हाला महापािलकेने नोटीस दिली नाही. आम्ही घरी नसताना झोपडी पाडली. काही लोकांच्या सांगण्यावरून आमची झोपडी पाडण्यात आली आहे. हा एका गरीब कुटुंबावर केलेला अन्याय आहे. कोणताही पर्याय नसल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला. अनिलपैठणकर,
दोन वर्षांपूर्वी नोटीस
पैठणकरयांची झोपडी सर्व्हिस गल्लीच्या जागेत होती. ही शासकीय जागा आहे. दोन वर्षांपूर्वी पैठणकर यांना जागा खाली करण्याबाबत नोटीस दिली होती. मात्र, त्यांनी जागा खाली केल्यामुळे बुधवारी (दि. ७) आम्ही अतिक्रमण कारवाईदरम्यान झोपडी पाडली. तसेच त्या झोपडीतील साहित्यही जप्त केले आहे. उमेशसवाई, निरीक्षक,अतिक्रमण विभाग, महापालिका.