अमरावती- ‘उठमतदारा जागा हो, लोकशाहीचा धागा हो' हा संदेश देत महापालिकेच्या वतीने शनिवारी (दि. 11) मतदार जागृती फेरी काढण्यात आली. अमरावती बडनेरा या दोन विधानसभा मतदार संघात अधिकारी-कर्मचा-यांकडून मतदानाबाबत जागृती करण्यात आली. पालिकेच्या फेरीचे विविध ठिकाणी स्वागत देखील करण्यात आले.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयातून जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी हिरवी झेंडी दाखवत फेरीची सुरूवात केली. राजकमल चौक, रेल्वे स्टेशन चौक, बस स्थानक रोड, चपराशीपुरा, व्हाया मिनी बायपास, दस्तुर नगर चौक, राजापेठ चौक, बडनेरा रोड, समर्थ विद्यालय, शिलांगण रोड, चंद्र नगर, डी-मार्ट, बडनेरा रेल्वे उड्डाणपूल, चांदणी चौक, बडनेरा विश्रामगृह, झंझाड पुरा, आठवडी बाजार, जयस्तंभ चौक या मार्गाने फिरत बडनेरा झोन कार्यालयात फेरीचा समारोप करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात मतदानाबाबत सर्वांना शपथ देण्यात आली. बडनेरा झोन येथे मतदार जागृतीबाबत स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. चपराशीपुरा येथील पालिकेच्या शाळा क्रमांक १६ च्या मुख्याध्यापक संध्या वासनिक, आफाक शिक्षकांकडून आयुक्त अरुण डोंगरे यांना पुष्पगुच्छ देत रॅलीचे स्वागत करण्यात आले. दस्तुर नगर शाळा क्रमांक ११ चे मुख्याध्यापक अनिल व्यास, बडनेरा शाळा क्रमांक १० चे मुख्याध्यापक मुफ्तार अहमद, हमजा जलीस शिक्षकांच्या वतीने देखील स्वागत करण्यात आले. मतदाराला जागृत करण्यासाठी अनेक प्रकारचे पोस्टर्स, होर्डींग रथ बनविण्यात आले होते. यावेळी उपायुक्त विनायक औगड, रमेश मवासी उपस्थित होते. फेरीच्या यशस्वितेसाठी सहाय्यक आयुक्त राहुल ओगले, योगेश पीठे, नरेंद्र वानखडे, शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्यामसुंदर
सोनी, डॉ. देवेंद्र गुल्हाणे, जकात अधीक्षक सुनील पकडे, शिक्षणाधिकारी डॉ. सविता चक्रपाणी, शाळा निरीक्षक चित्रा खोब्रागडे, प्रवीण पाटील, शिक्षक योगेश पखाले, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, भूषण राठोड, निखिल तिवारी यांनी प्रयत्न केले.