आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Commissione, Latest News In Divya Marathi

मनपा आयुक्तांना मनसे कोंडणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महापालिकेने फुटपाथवर होर्डिंग व अँड पोल लावण्याची परवानगी देऊन शहरातील जनतेची दिशाभूल केली आहे. यात केवळ कंत्राटदारांचा विचार करण्यात आला आहे. या प्रकरणातील सत्य जोपर्यंत बाहेर येणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांना दिला आहे.
शहरातील फुटपाथ जाहिरातीच्या फलकांनी, तर कुठे दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणामुळे ‘अदृश्य’ झालेत. बसस्थानकासमोरील सायंस्कोर शाळेजवळील भिंतीला लागून फुटपाथवर कंत्राटदाराने दोन मोठे जाहिरात फलक उभारलेत. परिणामी फुटपाथची रुंदी कमी झाली. शेगाव नाक्यावरसुद्धा नियमांची अशीच पायमल्ली झाली आहे.

मनसेचे आयुक्तांना प्रश्न :
फुटपाथवरील होर्डिंगमुळे अपघात किंवा जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण? शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर जे अँड पोल व होर्डिंग लावलेत, त्याची रीतसर परवानगी कंत्राटदाराने बांधकाम विभागाकडून घेतली का? घेतल्यास ती कोणत्या तत्त्वावर घेतली; त्याला जबाबदार कोण? असे विविध प्रश्न मनपा आयुक्तांना निवदेनाद्वारे विचारण्यात आले आहेत. सात दिवसांच्या आत संबंधित कंत्राटदारावर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष प्रवीण तायडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांना दिला.