अमरावती- राष्ट्रीयस्तरावरील स्मार्ट सिटी पुरस्कार प्राप्त केल्यानंतर आयुक्त अरुण डोंगरे यांनी ‘स्मार्ट ऑफिस मिशन’ सुरू केले आहे. मुख्य प्रशासकीय कार्यालयासह सर्वच विभागांत साफसफाई मोहीम राबवण्याचे निर्देश आयुक्तांकडून देण्यात आले असून, कोणत्या विभागामार्फत काटेकोर अंमलबजावणी होतेय, याची पुढील आठवड्यात पाहणी होणार आहे.
शासकीय कार्यालय म्हटले, की फाइलींचा खच दिसून येतो. मात्र, संगणक क्रांतीच्या युगात शासकीय कार्यालयांनीही मागे राहता ‘ई-गव्हर्नन्स’ची वाट चोखाळायला पाहिजे. पंतप्रधान
नरेंद्र मोदींनी देशातील शंभर शहरांना ‘स्मार्ट सिटी’ बनवणार असल्याचे घोषित केले, त्यानंतर कार्यालयातील कामकाजामध्ये बदल करत अनेक शहरांनी पाऊल उचलले आहे. अमरावती महापालिकेनेदेखील ऑटो डीसीआर प्रणालीला ई-गव्हर्नन्सचे उत्तम उदाहरण म्हणून समोर आणले. देशपातळीवर त्याचे मार्केटिंग करत केंद्र शासनाचे आठ मंत्रालय मिळून असलेल्या विभागांतर्गत पालिकेला ‘स्मार्ट सिटी’ तसेच ‘स्कॉच’ पुरस्कारदेखील मिळाला आहे. राष्ट्रीय स्तरावरील ‘स्मार्ट सिटी’ पुरस्कार मिळाल्यानंतर मनोबल वाढलेल्या पालिकेत ‘स्मार्ट ऑफिस’ हे मिशन आयुक्तांनी हाती घेतले आहे. सर्वच विभागांत साफसफाई मोहीम सुरू करण्यात आली अाहे. महात्मा गांधींच्या जयंतीदिनापूर्वी पालिकेतील सर्वच विभागांत स्वच्छतेबाबत आयुक्तांनी पत्र दिले होते. त्यानंतर सर्वच विभागांनी फाइलचा खच कमी करण्याचा प्रयत्न केला असून, फाइल्स कार्यालयातून अचानक कमी झाल्या असून, सर्वच िवभागांचा ‘लूक’ बदलला आहे.
आकस्मिकभेट देणार
सर्वचविभागांमध्ये साफसफाई मोहीम राबवण्याबाबत आयुक्तांनी पत्र दिले होते. विभागांकडून साफसफाई करण्यात आली किंवा नाही, याबाबत स्वत: आयुक्त अरुण डोंगरे पाहणी करणार आहेत. २९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरदरम्यान कोणत्याही दिवशी त्यांच्याकडून विभागांची पाहणी होऊ शकते.