आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापौरपदासाठी रणसंग्राम : निवडणूक कार्यक्रम घोषित; 9 सप्टेंबरला निवडणूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - विभागीयआयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी सोमवारी (दि. १) महापौर, उपमहापौर निवडणूक कार्यक्रम घोषित केला असून, मंगळवारी (९ सप्टेंबर) निवडणूक होणार आहे. त्यामुळे महापालिकेत राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

मंगळवारी (९ सप्टेंबर) सकाळी ११ वाजतापासून निवडणूक प्रक्रियेस सुरुवात होणार असून, महापौर नंतर उपमहापौरांची निवड प्रत्यक्ष मतदानपद्धतीने घेतली जाणार आहे. बहुमताने निवडून आलेल्या महापौर उपमहापौरांच्या निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडून मतदानानंतर केली जाणार आहे. विद्यमान महापौर वंदना कंगाले यांचा कार्यकाळ रविवारी (७ सप्टेंबर) संपुष्टात येत असल्याने निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. महापौरांसह उपमहापौर नंदकिशोर वऱ्हाडे यांचा कार्यकाळदेखील संपुष्टात येत आहे. महापालिका निवडणुकीनंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसदरम्यान सत्ता वाटपाबाबत करार करण्यात आला होता. अडीच वर्षे काँग्रेसचा महापौर, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा उपमहापौर आणि पुढील अडीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर तर काँग्रेसचा उपमहापौर राहणार असल्याचे निश्चित करण्यात आले होते.

काँग्रेसच्या महापौरांचा अडीच वर्षांचा कालावधी संपत आल्यामुळे ही निवडणूक घेतली जाणार आहे. मात्र, आगामी निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोपी नसल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत आमदार रवि राणा यांची पत्नी नवनीत राणा यांना तिकीट देण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा प्रवक्ते संजय खोडके यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. याचे परिणाम महापालिकेतील राजकारणावर स्पष्टपणे पडले असून, आगामी निवडणुकीत त्याचे पडसाद उमटणार आहेत. महापौर पदावर खोडके गटाकडून दावा करण्यात आला आहे. अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून खोडके गटाच्या एनसीपी फ्रंटला काँग्रेस प्राधान्यक्रम देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आगामी निवडणूक रंगतदार होणार असल्याचे दिसून येत आहे.

वादाची किनार
महापौरउपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवारी ( दि. ५) सकाळी ११.३० ते दरम्यान नामांकन दाखल करता येणार आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत नामांकन दाखल झाल्यानंतर आगामी महापाैराबाबत जवळपास निश्चित होणार आहे. शुक्रवारी नामांकन दाखल होणार असले, तरी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसदरम्यान अद्याप बोलणीच झाली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे या निवडणुकीला वादाची किनार राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.