आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेच्या नववर्षातील आमसभेत नगरसेवकांनी मंगळवारी महापौरांना सुनावले खडे बोल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महापालिकेतील परिवहन समितीच्या मुद्द्यावरून मंगळवारच्या आमसभेत थेट पीठासीन सभापती महापौर चरणजित कौर नंदा यांनाच नगरसेवकांनी खडे बोल सुनावले. ‘सभागृहाला वेठीस धरू नका. हे सभागृह तुमच्या घरचे नाही. गेल्या बैठकीत बोलल्या, त्यानुसार वागा. नाहीतर सभागृह चालू देणार नाही,’ असे नगरसेवकांचे खडे बोल होते.

२०१५ या नवीन वर्षातील पहिली आमसभा मंगळवारी (दि. २०) विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली. या वेळी हा अभूतपूर्व प्रसंग िदसून आला. विषयय तालिकेनुसार सभेच्या प्रारंभीच परिवहन समितीच्या गठनाचा मुद्दा समोर आला. मात्र, नेहमीप्रमाणे या वेळीही तो मुद्दा स्थगित होण्याकडे झुकतो आहे, हे लक्षात येताच काही गटनेते नगरसेवक पेटून उठले. यानंतर सातत्याने नगरसेवक आवाज उठवत असल्याने महापौरही हताश झाल्या होत्या.

बस येतील की नाही... : परिवहनसमितीच्या स्थापनेचा मुद्दा वारंवार पुढे ढकलला जात असल्यामुळे तुषार भारतीय साशंक होते. ते म्हणाले, याचा दुसरा अर्थ असा तर नाही, की अमरावतीत स्टार बसेस येणारच नाहीत. त्यामुळे एक तर समिती त्वरेने गठित करा. नाही तर नागरिकांना स्पष्ट सांगून त्यांची दिशाभूल तरी थांबवा. यावर बबलू शेखावत यांनी स्टार बसचे मॉडेल एप्रिलमध्ये दाखल होणार असल्याचे स्पष्ट केले.