आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या घरकुल, शौचालयाचा मुद्दा तापला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आक्रोश बसप कार्यकर्त्यांचे मनपासमोर ढोल बजाओ आंदोलन
बीपीएलच्या यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी ५४९ रुपयांची उत्पन्न मर्यादा ठरवण्यात आली आहे. ती बदलवून २५ ते ३० हजार रुपये करण्याची मागणीही या वेळी रेटण्यात आली. शिवाय बीपीएल यादीत खऱ्या गरिबांची नावे समाविष्ट केली जावी, असे प्रतिनिधी मंडळाचे म्हणणे होते.
रमाईघरकुल वैयक्तिक शौचालय योजनेसाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा धी अजूनही खर्च झाल्याच्या निषेधार्थ बहुजन समाज पक्षाने गुरुवारी मनपासमोर ढोल-ताशे बजाओ आंदोलन केले.

माजी नगरसेवक मंगेश मनोहरे पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी राजीव बसवनाथे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात संजय गांधीनगर, बिच्छू टेकडी, राहुलनगर, काँग्रेसनगर, हमालपुरा, बडनेरा, शेगाव आदी भागांतील पुरुष-महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना निवेदन सोपवून विविध सहा मागण्या करण्यात आल्या.त्यानुषंगाने आगामी १५ दिवसांत फरक जाणवेल, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली आहे.

निवेदनकर्त्यांच्या मते घरकुलांसाठी १० कोटी ९३ लाख ८१ हजार, तर वैयक्तिक शौचालय योजनेसाठी कोटी २४ लाख हजार, अशी एकूण १६ कोटींपेक्षा जास्त रक्कम मनपाला प्राप्त झाली आहे. परंतु, वर्षभरापासून या रकमेचा कोणताही विनियोग झाला नाही.दुसरीकडे मनपाने अनेकांचे प्रस्ताव घेतले मात्र,त्यावर कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे मनपा त्या पैशाचे व्याज खाते का, असा उद्वे्गजनक सवाल आंदोलनकर्त्यांचे नेते मंगेश मनोहरे यांनी या वेळी उपस्थित केला.

घरकुल शौचालयाच्या मागणीसाठी महापालिकेसमोर आंदोलन करताना बहुजन समाज पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते. छाया: मनीष जगताप
बसपच्या मागणीनुसार निश्चितच कारवाई केली जाईल. त्यामुळे आगामी १५ दिवसांत बदल झालेला असेल. गरजू पात्र नागरिकांना घरकुल देण्यासंदर्भात प्रशासन नेहमीच सकारात्मक आहे. आगामी काळात ही प्रक्रिया आणखी तीव्र गतीने पुढे नेण्याचा प्रयत्न करू. चंद्रकांत गुडेवार, आयुक्त, मनपा, अमरावती.