आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापालिकेकडून राबवण्‍यात आलेल्‍या शिबिरातून दोन दिवसांत तीस लाखांचे उत्पन्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महापालिकेकडूनराबवण्यात आलेल्या शिबिरांमधून दोन दिवसांत तब्बल ३० लाख ५३ हजार रुपये मालमत्ता रूपात वसूल करण्यात आला. एलबीटीची वसुली कमी होत असल्याने उत्पन्नवाढीच्या दृष्टीने पालिकेने मालमत्ता कर वसुलीकडे लक्ष केंद्रित केले आहे. बडनेरा झोन अंतर्गत घेण्यात आलेल्या शिबिरामधून ही वसुली करण्यात आली.
सुटीचा दिवस असताना रविवारी तब्बल २१ लाख, तर शनिवारी (२० सप्टेंबर) ९.५३ लाख रुपये मालमत्ता कराच्या रूपात वसूल करण्यात आले. बडनेरा झोन कार्यालयांतर्गत आठ वाॅर्डात मालमत्ता कर वसूल शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. ५०, ६०, ६१, ६३, ६४, ६७,६८,७० आदी वाॅर्डांमध्ये मालमत्ता कर वसुली शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. कंवरनगर चाैकातील प्रिमी फुड्स जवळ, गणेशनगरातील सद््गुरू कोचिंग क्लासेस जवळ, प्रभादेवी मंगल कार्यालय, नवाथेनगरातील डॉ. सुरेंद्र काळबांडे हॉस्पिटल जवळ, भक्तिधाम मंदिराजवळ साईनगर, तसेच मूकबधिर विद्यालयाजवळ अकोली रोड येथे शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेकडून मालमत्ता वसुलीसाठी घेण्यात आलेल्या शिबिरांना नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून एलबीटी भरण्यास व्यापाऱ्यांकडून विरोध केला जात आहे. महाराष्ट्र शासनानेदेखील जकात एलबीटीबाबत निर्णय महापालिकेवर सोपवला. निर्णय महापालिकेला घ्यावयाचा असला, तरी महाराष्ट्र शासनाकडून अधिकृत पत्र पाठवण्यात आले नाही. त्यामुळे एलबीटी की जकात, याबाबत पालिकेकडून निर्णय घेण्यात आला नाही. व्यापाऱ्यांकडून एलबीटी भरण्यास प्रतिसाद नसल्याने पालिकेचे उत्पन्न बुडत आहे. उत्पन्नाचा समतोल राखता यावा म्हणून पालिकेने मालमत्ता कर वसुलीकडे लक्ष केंद्रित केले आहे.
मालमत्ता कराचा धनादेश स्वीकारताना आयुक्त अरुण डोंगरे. समवेत नागरिक पािलकेचे अधिकारी.