आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवटेकडीहून सुरू झाले महापालिकेचे वृक्षारोपण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(महापौर रिना नंदा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या हस्ते शिवटेकडीवर वृक्षारोपण केले गेले, तो क्षण.)
अमरावती- शहरिहरवेगार करण्यासाठी सुरु झालेल्या प्रयत्‍नांचा एक भाग म्हणून आज, मंगळवारी शिवटेकडीवर वृक्षारोपण केले गेले. महापौर चरणजीत कौर नंदा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या एका कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरुपातील १५ झाडे लावण्यात आली.
यामध्ये चिकू, जांभूळ अशा काही फळझाडांचाही समावेश आहे. ट्री गार्डविनाच वृक्षारोपण करता यावे म्हणून मनपाने आंध्र प्रदेशातील राजमंडरी येथून सुमारे तीन हजार मोठी झाडे मागवली आहेत. गेल्या दोन दिवसांत ही झाडे अमरावतीत दाखल झाली.
आता ती निरनिराळ्या प्रभागांमध्ये लावली जाणार आहे. भरपूर प्राणवायू देणारा कडूलींब, पिंपळ, वड, फणस, जांभूळ, चीकू यासह अशोकाच्या झाडांचाही या तीन हजार झाडांमध्ये समावेश आहे. विविध प्रभागात या झाडांचे रोपण केले जाणार आहे. कार्यक्रमाला स्थायी समितीचे सभापती विलास इंगोले, लप्पी जाजोदिया, नगरसेवक दिनेश बूब प्रदीप हिवसे, उपायुक्त विनायक अौगड, पर्यावरण अधिकारी महेश देशमुख, उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर आदी अधिकारी-पदािधकारी उपस्थित होते.
आंध्र प्रदेशातून आणली झाडे
ट्रीगार्डची गरज नसलेली ही उंचच उंच झाडे आंध्र प्रदेशातील राजमंडरी येथील नर्सरीतून आणण्यात आली आहेत. उंच डौलदार झाडे पुरविणारी यंत्रणा म्हणून या नर्सरीकडे पाहिले जाते. झाडे उंच असल्यामुळे ती सहज जगवता येतात शिवाय त्याच्या संरक्षणासाठी ट्री गार्डचीही गरज भासत नाही.