आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्टार बसची अमरावती करांना करावी लागणार प्रतीक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- आणखी काही महिने स्टार बसेस येण्याची वाट पाहण्याची वेळ महापालिकेवर व पर्यायाने अमरावतीकरांवर आली आहे. परिवहन समितीचे गठण रखडल्याने स्टार बस खरेदीदेखील लांबणीवर पडणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. स्टार बस खरेदीबाबत टाटा मोटर्सला 15.68 कोटी रुपयांची निविदा मिळाली असली, तरी निर्णय घेणारी परिवहन समितीच नसल्याने प्रशासनाला स्टार बससाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मंगळवारी (17 जून) झालेल्या आमसभेत परिवहन समितीसाठी सदस्यांची नावे जाणार होती.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदाचे वादंग सुरू झाल्याने सर्वसाधारण सभेमध्ये काहीही कामकाज होऊ शकले नाही. त्यामुळे परिवहन समितीचे गठणदेखील रखडले आहे. एप्रिल महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, टाटा मोटर्स या कंपनीला स्टार बसेस खरेदी करण्याबाबत परिवहन समितीची मान्यता घ्यावी लागणार आहे.
आमसभेमार्फत सदस्यांची नावे गेली असती, तर सभापती व उपसभापती निवडीची प्रक्रियादेखील आरंभ झाली असती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादंगामुळे समितीसाठी नावांची निवड करणे शक्य झाले नाही. त्याचा परिणाम स्टार बस शहरात उशिरा दाखल होण्यात दिसून येणार आहे.