आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यस्थी करणाऱ्या युवकाचा केला खून, विलासनगरात युवकावर चाकूहल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - दुसऱ्याच्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका ३० वर्षीय युवकाचा आठ जणांनी बेदम मारहाण करून खून केला.ही घटना खोलापुरी गेट पोिलस ठाण्याच्या हद्दीत जुनी टाकसाळ परिसरात शुक्रवारी रात्री घडली. विनोद नारायण बंुदेले (३०, रा. जुनी टाकसाळ, अमरावती) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हे नोंदवून सात जणांना अटक केली असून,आठव्या आरोपीचा शोध सुरू आहे.

शुक्रवारी रात्री संजय तंवर गोपाल तायडे तसेच त्याचे सात सहकारी यांचा क्षुल्लक कारणासाठी वाद सुरू होता. याच वादात मध्यस्थी करण्याचा विनोदने प्रयत्न केला. त्यावेळी संजय तर बाजूलाच राहिला; मात्र तायडे त्याच्या सात ते आठ सहकाऱ्यांनी विनोदला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण सुरू केली. या हाणामारीत विनोदला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी तातडीने इर्विन रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. होळीची पार्टी करण्यावरून हा वाद झाल्याचे पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासावरून पुढे आले आहे.

या प्रकरणी विनोदचा मित्र संजय लक्ष्मण तंवरच्या तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी आठ जणांविरुद्ध मारहाण, खून केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. आतापर्यंत गोपाल प्रभाकर तायडे, सुनील प्रभाकर तायडे, बजरंग अढायगे, संतोष नागोराव डोईफोडे, सोनू ऊर्फ सूरज संतोष डोईफोडे, आकाश संतोष डोईफोडे, सतीश नागोराव डोईफोडे (सर्व रा. जुनी टाकसाळ) यांना अटक केली असून, फरार असलेल्या फारुख खान (रा. हैदरपुरा ) याचा पोलिस शोध घेत आहे. याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ऐन धूलिवंदनाच्या दिवशी ही घटना घडल्याने जुनी टाकसाळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

रस्त्याने जाताना धक्का लागला, या क्षुल्लक कारणावरून दोन युवकांनी १८ वर्षीय युवकाला मारहाण करून त्याच्यावर चाकुहल्ला चढवला. यामध्ये तो युवक गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी विलासनगर परिसरात घडली. किरण कमलेश शेवने (१८, रा. विलासनगर) असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. याप्रकरणी याच परिसरात राहणारे सूरज वासनिक गामा ऊर्फ विजय कैथवास यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी किरण रस्त्याने जात असताना त्याचा विजय सूरजला धक्का लागला. यावरून दोघांनी सुरुवातीला किरणला शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या पोटात चाकूने हल्ला करून ते पसार झाले. नागरिकांनी किरणला रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. किरणच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी विजय सूरजविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. शुक्रवारी रात्रीपर्यंत मारेकऱ्यांना अटक झाल्याने परिसरातील अनेक नागरिकांनी पोिलस ठाण्यात जाऊन हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली.आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.