आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धाकट्यानेच केला थोरल्याचा खून ; मारेकरी अवघ्या तासाभरात जेरबंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - कृष्णार्पण कॉलनीमध्ये शनिवारी एका नालीत आढळलेल्या ४० वर्षीय व्यक्तीच्या मृतदेहाचे रहस्य तासाभरातच उलगडले असून, धाकट्यानेच थोरल्या भावाचा खून केल्याचे स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे.

किशोर नारायण श्रीपदवार (४०, रा. रविकिरण कॉलनी, अमरावती) असे मृतकाचे नाव आहे, तर गजानन नारायण श्रीपदवार (३२, रा. नेरपरसोपंत, ह. मु. रविकिरण कॉलनी, अमरावती) असे मारेकऱ्याचे नाव आहे. किशोर श्रीपदवार हे कृषी विभागात कर्मचारी होते. दहा ते बारा वर्षापूर्वी ते वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर नोकरीत लागले होते. कुटुंबात तीन भाऊ व दोन बहिणी आहेत. त्यांपैकी किशोर हा सर्वांत मोठा असल्यामुळे अनुकंपा तत्त्वावर नोकरीची संधी त्याला मिळाली. मात्र, तो कुटुंबाकडे लक्ष देत नव्हता. आईलाही योग्य रीतीने सांभाळत नव्हता, असे त्याच्या मारेकरी भावाने पोलिसांना सांगितले. शिवाय त्याला दारूचे व्यसन होते.

वारंवार समजावूनही तो ऐकून घ्यायला तयार नव्हता. त्यामुळेच किशोरला आपण मारून त्याचा मृतदेह नालीत फेकल्याचे गजानन याने अटक झाल्यानंतर पोलिसांना सांगितले. तत्पूर्वी, किशोरचे जावई प्रदीप प्रभाकर शेरेकर (४७, रा. वंृदावन कॉलनी, अमरावती) यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली होती. यानंतर पाेिलसांनी वेगाने तपास करत तासाभरात मारेकऱ्याला
अटक केली.