आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्या करून मृतदेह टाकला विहिरीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धामणगावरेल्वे-जळगाव आर्वी येथे चार दिवसांपूर्वी शेतात रखवालदारीसाठी गेलेल्या शेतकर्‍याचा रविवारी सायंकाळी गावाजवळील शेतात असलेल्या विहिरीत मृतदेह आढळून आला आहे. कुटुंबीयांनी ही हत्या असल्याचा संशय व्यक्त केला असून, या प्रकरणी दत्तापूर पोलिसांनी चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

सुरेश डोमाजी महाजन (48, रा. जळगाव आर्वी) असे मृतकाचे नाव आहे. महाजन गुरुवारी रात्री सायकलने घराबाहेर पडले. मात्र, शुक्रवारी ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. ते न सापडल्याने त्यांचे भाऊ संतोष यांनी दत्तापूर पोलिसांत सुरेश महाजन बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. शुक्रवारी रात्री त्यांचे टी शर्ट व जोडे सापडले. त्याचठिकाणी रक्तसुद्धा सांडले होते. त्यामुळे त्यांच्या हत्येचा संश्य व्यक्त होत होता. दरम्यान, दत्तापूर ठाण्याच्या ठाणेदार नीलिमा आरज यांनी सहायक पोलिस उपनिरीक्षक देविदास मुळे, र्शीकांत सानंदे, किशोर सानप, अमर धनकर यांच्यासह कर्मचार्‍यांचे पथक तयार करून शोधमोहीम सुरू केली होती. रविवारी सायंकाळी भोगे नामक शेतकर्‍याच्या विहिरीत महाजन यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर ही हत्या असल्याची तक्रार संतोष महाजन यांनी दत्तापूर पोलिसांत दाखल केली. पोलिसांनी मतदेह ताब्यात घेतला असून, शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. चौकशीसाठी चार जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

चौघांना चौकशीसाठी घेतले ताब्यात
सुरेश महाजन यांची हत्या झाली असावी. तशी तक्रार प्राप्त झाली आहे. चौकशीसाठी चौघांना ताब्यात घेतले आहे. हत्या कशासाठी व कोणत्या कारणावरून झाली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तपास सुरू आहे. नीलिमा आरज, ठाणेदार, दत्तापूर.