आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुलत वहिनीने करवला नितीन हिंगासपुरेचा खून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नितीन हिंगासपुरेच्या खुनाचा उलगडा करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. बुधवारी (दि. 7) पहाटे पोलिसांनी नितीनच्या चुलत वहिनीसह कारंजा लाड येथील मुख्य तीन मारेकर्‍यांना अटक केली. या महिलेने त्यांना 43 हजारांची ‘सुपारी’ दिली होती. आक्षेपार्ह छायाचित्रांद्वारे ब्लॅकमेल करीत असल्याने नितीनला संपवल्याची कबुली तिने दिल्याची माहिती पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी दिली.
नितीनचा अंजनगावबारी मार्गावर पोत्यात गुंडाळलेला मृतदेह सोमवारी (दि. 5) रात्री आढळला होता. या प्रकरणी मेघा श्याम हिंगासपुरे (रा. नंदनवन कॉलनी, अमरावती), समीर ऊर्फ अ. गनी अ. नजीर (26), आनंद रमेश गायकवाड (20) आणि गजानन रमेश भोंगळे (20) तिघेही (रा. कारंजा लाड) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त गंगाराम साखरकर, निरीक्षक प्रमेश आत्राम, ज्ञानेश्वर कडू, सहायक निरीक्षक रवि राठोड, सुमीत परतेकी, उपनिरीक्षक नरेंद्र पेंदाम, संतोष शिखरे, ओमप्रकाश देशमुख, दीपक दुबे, पंकज यादव, शंकर बावनकुळे संग्राम भोजने.
असे घडले हत्याकांड
अ. गनी याचा कारंजा शहरात फर्निचरचा व्यवसाय आहे. आनंद गायकवाड आणि गजानन भोंगळे हे त्याच्या दुकानात काम करतात. सोमवारी (दि. 5) गनीने त्यांना घेऊन अमरावती गाठले. दुपारी दोनच्या सुमारास त्याने मेघाशी संपर्क साधला. तिने नितीनला घरी बोलावले. त्यापूर्वीच गनीसह तिघे एका खोलीत दडून बसले होते. नितीन येताच त्यांनी पाइप आणि लोखंडी शस्त्राने त्याच्यावर हल्ला केला. यानंतर मेघाच्या काळ्या दुपट्टय़ाने गनीने त्याचा गळा आवळला. मेघाने गनीला नितीनच्या हत्येसाठी 50 हजार रुपये देण्याचे कबूल केले होते. त्यापैकी 43 हजार रुपये गनीला मिळाले आहेत.

ऑटोरिक्षाचे भाडे एक हजार : नितीनच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी गनीने बडनेरा येथील अकील हुसेन नामक ऑटोरिक्षाचालकाशी संपर्क करून त्याला नंदनवन कॉलनी येथील मेघाच्या घरी आणले. मैत्रिणीला घेऊन फिरायला जायचे आहे, असे त्याने अकीलला सांगितले