आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृषीकेशचा मारेकरी ब्रिजेशला अटक,जुन्या भांडणाचा वचपा काढण्यासाठीच केला खून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - महादेवखोरी परिसरात ब्रिजेश मूलचंद गुप्ता याने हृषीकेश ठाकरे या विद्यार्थ्यावर शनिवारी (दि. 7) तलवारीने हल्ला करून त्याचा खून केला होता. फ्रेजरपुरा पोलिसांनी या प्रकरणी ब्रिजेशला रविवारी (दि. 9) मध्यरात्री अटक केली. वचपा काढण्यासाठी खून केल्याचे तपासात पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले.


खुनानंतर ब्रिजेश शनिवारी पसार झाला होता. त्याला पकडण्यासाठी फ्रेजरपुरा आणि गुन्हे शाखेचे पोलिस पथक प्रयत्नरत होते. रविवारी मध्यरात्री तो शहरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सापळा रचून वडाळी परिसरातील गजानन महाविद्यालयाजवळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तत्पूर्वी, पोलिसांनी नागपुरातून ब्रिजेशची बहीण ज्योती गुप्ताला अटक केली. ब्रिजेश खुनानंतर नागपूरला गेला होता. त्या वेळी ज्योतीने त्याला मदत केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.


ब्रिजेशच्या एका नातेवाईक युवतीसोबत हृषीकेशची ओळख होती. ब्रिजेशला ते पसंत नव्हते. या प्रकरणी त्यांच्यात यापूर्वीदेखील वाद झाला होता. हल्ल्यात गंभीर असलेला हृषीकेशचा मित्र गौरवची प्रकृती समाधानकारक आहे.
सोमवारी फ्रेजरपुरा पेालिसांनी ब्रिजेश व त्याच्या बहिणीला न्यायालयापुढे हजर केले. प्रभारी सहायक पोलिस आयुक्त संजय डहाके व फ्रेजरपुराचे प्रभारी ठाणेदार मनीष ठाकरे यांनी ही माहिती दिली. पोलिस कोठडीदरम्यान ब्रिजेशकडून अजूनही बरीच माहिती पुढे येणार असल्याची शक्यता तपास अधिकारी व सहायक पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारींनी वर्तवला आहे. हृषीकेशच्या खुनानंतर महादेवखोरी परिसरात तणाव निर्माण झाला होता.