आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagpanchami Festival,Latest News In Divya Marathi

नागपंचमीसाठी लाह्या बाजारात; शहरात विविध परिसरांमध्ये विक्रेत्यांनी थाटली दुकाने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- श्रावणातला पहिला सण नागपंचमी शुक्रवारी (दि. 1) असल्याने शहरातील बाजारामध्ये लाह्या-फुटाण्यांचा प्रसाद विक्रीसाठी आला आहे. इतवारा बाजार, गांधी चौक, राजापेठ आदी विविध परिसरांत विक्रेत्यांनी आपापली दुकाने बुधवारी सायंकाळी थाटली.
कृषिप्रधान सांस्कृतीमध्येनागपंचमी या सणाला फार महत्त्व आहे. नागदेवतेचे मनोभावे पूजन करून दूध, ज्वारीच्या लाह्या व फुटाण्यांचा नैवेद्य दाखवला जातो. ज्वारी भाजून तयार केलेल्या लाह्या व फुटाण्याच्या प्रसादाचे या सणात महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक घरी हा प्रसाद खरेदी केला जातो. लाह्या, फुटाणे या प्रसादाशिवाय बरेच जण नागाची पूजा करत नाहीत, असे विक्रेत्यांनी सांगितले आहे. पूर्वी नागपंचमीच्या पंधरा दिवस आधीपासून शहरात लाह्या बनवण्याची भट्टी सुरू होत असे. अलीकडे रोस्टरद्वारे ज्वारीच्या लाह्या बनवल्या जातात. प्रत्येक विक्रेता सुमारे तीन ते चार पोती लाह्या होलसेल भावाने विक्रीसाठी घेतात. लाह्या वजनाने हलक्या असल्याने एका पोत्यामध्ये सुमारे पाच ते सहा किलो बसतात, असेही विक्रेत्यांनी सांगितले.