आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagpur Police Station Within The Borders Of The Criminals Criminals On The Exile Proceedings 15

नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील सर्वाधिक गुन्हेगार - 15 गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असलेल्या शहरातील 15 गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची कारवाई पोलिस आयुक्त अजित पाटील यांच्या आदेशान्वये उपायुक्त संजय लाटकर यांनी केली आहे. यात सर्वाधिक 11 जण नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील आहेत.
उद्धव काशीनाथ भोजने (35), अमोल गोपाल बिहाडे (23) दोघेही रा. नांदगावपेठ, अ. हबीब अ. बशीर (50), अ. रशीद अ. बशीर (52), अ. अनिस अ. अजीज (28), अ. असलम अ. अजिज (23), अ. सलीम अ. अजिज (25),अ. नईम अ. उस्मान (34), हबीब ऊर्फ हब्बू शाह वजीर शाह (49), नावेद शाह ऊर्फ सोनू हबीब शाह (24), जुनेद ऊर्फ मोनू हबीब शाह (21), रफिक शाह वजीर शाह (42), रशीद शाह वजीर शाह (40) सर्व रा. नुरानी चौक, वेदप्रकाश तलरेजा (39) रा. दस्तुरनगर आणि विक्की ऊर्फ दादू अशोक गणोस्कर (19) रा. माळीपुरा (खोलापुरी गेट) या 15 गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आल्याचे उपायुक्त संजय लाटकर यांनी सांगितले.
कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान तलवार जप्त
सोमवारी सकाळी गुन्हे शाखा, मुख्यालय आणि नागपुरी गेट पोलिसांनी नागपुरी गेट हद्दीतील काही भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवले. या वेळी पाच पथकांनी गुन्हेगारांच्या घरांची झडती घेतली. सलीम शाह बशीर शाह (50 रा. अकबरनगर) याच्या घरात पोलिस निरीक्षक सुमीत परतेकी यांच्या पथकाला तलवार मिळाली. पोलिसांनी ती जप्त केली आहे. निवडणुकीचा काळ लक्षात घेता, शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी यापुढे देखील कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.