आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Namdeo Maharaj Death Anniversary Celebrated News In Marathi, Divya Marathi

संत नामदेव महाराज पुण्यतिथी साजरी; भाविकांची मांदियाळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती-

धन्य आज दिन संत दश्रनाचा ।
अनंत जन्मीचा शीण गेला ।
मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे ।
कदा न सोडावे चरण त्यांचे

अशा विविध अभंगांच्या गजरात संत नामदेव महाराज यांची पुण्यतिथी गुरुवारी (दि. 24) गाडगेनगर परिसरात धार्मिक वातावरणात साजरी झाली. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात आले.
गाडगेनगर परिसरातील श्री संत नामदेव महाराज मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने नामदेव महाराज मंदिरामध्ये सकाळपासून अभिषेक, पूजा व विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. दहा वाजता मंदिरापासून संत गाडगेमहाराज समाधीमंदिरापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. वारकर्‍यांची भजने, संतनामाचा जयघोष, बँड पथक व महिला मंडळाची भजने, अशा भक्तिमय वातावरणात पालखी मिरवणुकीचा सोहळा पार पडला. मिरवणुकीनंतर कीर्तन व गुणवंतांचा सत्कार समारंभ झाला. आमदार रवि राणा व नवनीत राणा यांची या वेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. संत नामदेव महाराज भवनासाठी निधी उपलब्ध करून देऊ व विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी मदत करू, असे आमदार राणा यांनी या वेळी सांगितले. नवनीत राणा यांच्या हस्ते इयत्ता दहावी, बारावीतील 22 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. समाजबांधव व पालकांची या वेळी उपस्थिती होती. दुपारी परिसरातील सुमारे एक हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भास्करराव टोम्पे, अनंत जांगजोड, रामदास खोडे, विजय बिडवाईक, किरण जावरकर, दीपक जावरकर यांच्यासह पदाधिकारी पालखी मिरवणुकीत सहभागी होते.
महिलांचा उत्स्फूर्त सहभाग : संत नामदेव महाराज यांची फुलांनी सजवलेली पालखी खांद्यावर घेऊन भाविक मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीच्या मार्गावर भाविकांनी पालखीचे दश्रन घेतले. गाडगेनगर परिसरातील महिला उत्स्फूर्तपणे मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.

कीर्तनांतून समाजप्रबोधन
संत अच्युत महाराज यांचे शिष्य सचिन महाराज यांचे दुपारी कीर्तन झाले. संत नामदेव महाराज यांच्या जीवनचरित्राविषयी त्यांनी कीर्तनातून माहिती दिली व समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी समाजबांधवांनी संघटित व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. परिसरातील भाविक-श्रोत्यांची कीर्तनाला उपस्थिती होती.