आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाईमध्ये ‘नमो’ जॅकेटची वाढतेय क्रेझ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अलीकडेपंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:च एक स्टाईल आयकॉन झाले आहेत. त्यांचे जॅकेट कुर्त्यांची स्टाईल तरुणाईमध्ये लोकप्रिय होऊ लागली आहे. मोदी जॅकेट कुर्त्यांना युवा वर्गाकडून मागणी होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
चित्रपटातील नायक-नायि का यांच्या कपड्यांची किंवा चित्रपटातील त्यांच्या लूकची तरुणाईकडून लगेच कॉपी केली जाते. मात्र एखाद्या राजकीय नेत्याच्या कपड्यांची स्टाईल तरुणाईमध्ये इतकी ‘आपली’ व्हावी हे प्रथमच घडत असल्याचे दिसून येते. जशी मोदी यांच्या जॅकेट, कुर्त्याची चर्चा माध्यमांमध्ये झाली, तशीच ती युवकांमध्येही झाली. केवळ चर्चाच झाली नाही, ती स्टाईल फॅशन म्हणून प्रचलनातही आणली. मोदींचे नाव पंतप्रधानाच्या यादीत यायला लागल्यापासून नमो जॅकेटची क्रेझ युवकांमध्ये दिसून येत आहे. पूर्वी वेस्ट कोट म्हणून ओळखले जात असे. मात्र मोदी इफेक्टपासून ते मोदी जॅकेट म्हणून ओळखले जाऊ लागल्याने त्याला ‘नमो जॅकेट’ असे नाव दिल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. नमो जॅकेटसाठी लेनिन, ज्यूट, इटालियन फॅब्रिकचा उपयोग करण्यात येतो.

नेहरु कुर्ता अद्यापही फॅशनमध्ये
देशाचेपहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा चुडीदार जॅकेटने त्या काळी युवकांना भूरळ पाडली होती. मात्र इतके वर्षे लोटली असली, तरी आजही नेहरु कुर्ता चुडीदार तितकाच चलनात आहे. फरक इतकाच की फॅशनच्या दुनियेत चुडीदारला थोडा आधुनिक टच मिळाला आहे. कुर्त्यामध्ये फार काही बदल झाला नाही.
सण-समारंभातहीवापर
दैनंदिनवापरासाठी जरी हे जॅकेट्स युवकांना वापरता येत नसले, तरी सण, समारंभ, लग्न, महाविद्यालयातील कार्यक्रम या प्रसंगी युवावर्ग नमो जॅकेट्सचा हमखास वापर करताना दिसत आहेत. कुर्त्याला मात्र त्यांनी दैनंदिन जीवनात स्थान दिले आहे.