आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदगावपेठ टोलनाका-मनसेने केली घोषणाबाजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती-टोलनाक्याच्या मुद्दय़ावरून राज ठाकरे यांनी दिलेला इशार्‍याच्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांनी शहरात निदर्शने आणि घोषणाबाजी करत सौम्य आंदोलन केले.
नांदगावपेठ टोलनाक्यावर सोमवारी जमलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी टोलवसुली बंद पाडण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत नाक्यावर घोषणाबाजी आणि निदर्शने करण्यात आली. मनसे नेते पप्पू पाटील, ज्ञानेश्वर धाने पाटील, संतोष बद्रे, प्रवीण तायडे यांच्या नेतृत्वात सोमवारी दुपारी दोन वाजता मनसेचे 15 ते 20 कार्यकर्ते अणि पदाधिकारी यांनी नांदगावपेठनजीकच्या टोलनाक्यावर घोषणाबाजी केली. पोलिसांना अगोदरच आंदोलनाची चुणूक लागल्याने नाक्यावर चोख बंदोबस्त तैनात होता. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांना तीव्र आंदोलन करण्याची संधी मिळाली नाही. अमरावतीपासून 12 किलोमीटरवर आयआरबी कंपनीचा टोलनाका आहे. येथे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तेव्हा दहा मिनिटे टोलवसुली थांबवण्यात आली होती. मात्र, त्यानंतर वसुली पुन्हा नियमितपणे सुरू करण्यात आली. मनसे पदाधिकार्‍यांव्यतिरिक्त बच्चू रेळे, धीरज तायडे, श्याम धाने, पवन दळवी, विजय र्शीमाळी, राम पाटील हे कार्यकर्ते अंदोलन सहभागी झाले होते. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेऊन मुख्यालयी नेले.