आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता हवी मतांची हमी, शक्तिप्रदर्शन करणा-यांना राणेंनी दिली सक्त ताकीद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- दहावर्षांत राज्यात आघाडी सरकारने विकासाची प्रचंड कामे केली आहेत. त्याच्याच आधारावर प्रचार करा. घराघरांत जा, लोकांशी थेट संवाद साधा, असा कानमंत्र काँग्रेसचे प्रचार प्रमुख तथा माजी मंत्री नारायण राणे यांनी दिला.
काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ सोमवारी राणे यांनी अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात फोडला. या प्रसंगी ते बोलत होते. काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीचे सुधाकर गणगणे, जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध उपाख्य बबलू देशमुख, संजय अकर्ते, आमदार रावसाहेब शेखावत, आमदार जगदीश गुप्ता, आमदार अ‍ॅड. यशोमती ठाकूर, आमदार केवलराम काळे, माजी मंत्री वसुधा देशमुख, पुष्पा बोंडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. राज्यातील प्रचाराचे नारळ अमरावतीतून फोडण्याचा निर्णय घेत काँग्रेसने विदर्भाला पुन्हा न्यायच दिला आहे, असे मत या वेळी मान्यवरांनी व्यक्त केले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे राज्यात आघाडीबाबत सुरू असलेल्या घडामोडींमुळे या सभेला अनुपस्थित होते.

पंतप्रधानमोदींना केले ‘टार्गेट’
भाषणाप्रसंगीनारायण राणे यांनी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकेची झाडे उडवली. पंतप्रधानांनी जनतेशी विश्वासघात केल्याचे ते म्हणाले. याच सोबत सेने नेते उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली.