आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तो’ राजकीय वाद ऐकून मोदींनाही धक्का

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- ‘कैसा चल रहा है प्रचार कार्य. समीकरण क्या बोल रहे है अमरावती के? आप तयारी किजीए अडसूल जी, मेरा शेड्यूल्ड देख के मै तारीख बताता हू. अमरावती आना ही पडेगा.’ हे उद्गार आहेत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे.
वर्धा येथील सभेनंतर मोदी यांनी विद्यमान खासदार तथा महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्याकडून समीकरणांबद्दल माहिती घेतली. नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, आनंदराव अडसूळ आणि प्रतापराव जाधव असे चतु:मूर्ती आपापल्या मतदारसंघातील राजकीय समीकरणांची माहिती देत होते. तेवढय़ात कुणीतरी मोदींना सांगितलं, ‘साहब, अडसूल की प्रतिस्पर्धी प्रत्याशी ने तो पुलिस में ही शिकायत दर्ज कर दी.’ तक्रारीचे नेमके कारण ऐकून मोदींनाही आधी हसू आले, मग आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, या विषयाला जास्त गंभीर घेऊ नका, असा सल्ला त्यांनी दिला.‘देखीए जी, हम विकास की राजनीती करने वाले लोग है.’ हे त्यांचे उच्चार. तेवढय़ात गडकरी आणि अडसूळ यांनी मोदींना अमरावती सभेसाठी येण्याची विनंती केली. क्षणाचाही विलंब न करता मोदी उच्चारले, ‘अमरावती आना ही पडेगा. मुझे अमरावती आना ही है. चलीए तारीख देख के जल्द ही सूचित करूंगा.’ त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचेतना संचारली. मतदानासाठी जेमतेम 19 दिवसच शिल्लक राहिल्याने मोदी कधीची तारीख देणार अन् तयारी कधी करणार, असा प्रo्नही महायुतीच्या कार्यकर्त्यांना पडला. पण, मोदींनी चटकन होकार दिल्याने ते प्रचारासाठी वेळ काढतील, असा विश्वास सार्‍यांना वाटला. पश्चिम विदर्भासाठी अमरावतीत सभा घेण्याचा रेटाही काहींनी दिल्याने भाजपच्या ‘कोअर कमिटी’ने हा मुद्दा लागलीच अजेंड्यावर घेतला.