आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीच्या बैठकीत ठरले नरेंद्र मोदीच होणार पंतप्रधान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- भाजपचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी आरूढ करण्यात अमरावती जिल्ह्याने मोलाचा वाटा उचलला आहे. अमरावतीच्या याच मातीतून नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाचा मार्ग गेला असल्याचे कालांतराने झालेल्या घडामोडींनंतर स्पष्ट झाले आहे.
मोदींच्या नावावर पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जुलै 2013 मध्ये अमरावतीत शिक्कामोर्तब करण्यात आले, तर मोदींच्या पंतप्रधानपदाची पहिलीवहिली घोषणाही ऑगस्ट 2013 मध्ये अमरावतीतूनच करण्यात आली होती, हे विशेष. भाजपचे प्रवक्ते राजीवप्रताप रूडी यांनी 10 ऑगस्ट 2013 ला मोदींच्या पंतप्रधानपदाची घोषणा केली होती. मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करावयाचे की नाही, यावर अमरावतीत आठ जुलै ते 15 जुलै 2013 दरम्यान झालेल्या बैठकीत मंथन करून अंतिम निर्णय घेण्यात आला होता, हे रा. स्व. संघाच्या अंतर्गत घडामोडींनतर दिसून आले. या महत्त्वपूर्ण निर्णयाकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिकाच महत्त्वाची ठरली. येत्या 26 मे रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आठ दिवसीय मॅरॉथॉन बैठक मागील वर्षी आठ जुलै ते 15 जुलैदरम्यान अमरावतीच्या व्यंकटेश लॉन परिसरात घेण्यात आली होती.

राजनाथ सिंग यांची भाजपाध्यक्षपदी झालेली नियुक्ती, नितीशकुमार यांनी रालोआला दिलेली सोडचिठ्ठी, लालकृष्ण अडवाणी यांची नाराजी, नरेंद्र मोदी यांची भाजपचे प्रचारप्रमुख म्हणून झालेली निवड, देशपातळीवरील भाजपाची कामगिरी आणि पंतप्रधानपदी निवड करण्यासाठी संघाची भूमिका आदी महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत मंथन झाले होते. मात्र, रा. स्व. संघाच्या बैठकीत कोणत्याही प्रकारचा राजकीय अजेंडा.