आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Health Mission Employee Job Issue In Amravati

"एनएचएम'च्या ६०% कर्मचाऱ्यांवर गंडांतर, ४४ कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून केले कमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राष्ट्रीय आरोग्य मिशन (एनएचएम) अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय कर्करोग, मधुमेह, पक्षाघात प्रतिबंधक नियंत्रण कार्यक्रम आणि राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य शुषुश्रा कार्यक्रमांतर्गत कार्यरत जिल्ह्यातील ६० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले अाहे. राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्राच्या संचालकांच्या शिफारशीवरून ही पदे कमी करण्यात आली आहेत.
राष्ट्रीय आरोग्य मिशन (एनएचएम) अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय कर्करोग, मधुमेह, पक्षाघात प्रतिबंधक नियंत्रण कार्यक्रम आणि राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य शुषुश्रा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात २००७ पासून विविध पदांवर एकूण ७२ कर्मचारी कार्यरत होते. यांपैकी ४४ कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे.
राष्ट्रीय कर्करोग, मधुमेह, पक्षाघात प्रतिबंधक नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात मंजूर असलेल्या ५२ पदांंपैकी २८ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले असून, २४ कर्मचाऱ्यांनाच पुढे काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य शुषुश्रा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात २० पदे मंजूर होती. त्यांपैकी १६ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. यात प्रयोगशाळा तंत्रज्ञ, समुपदेशक, पुनर्वसन कर्मचारी, स्वच्छता सहायक, आरोग्य केंद्र सहायक आदींचा समावेश आहे.

जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य मिशनचा कार्यक्रम बहुतांश कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे. केंद्र राज्यातील विविध आरोग्य योजना राबवताना अल्प मनुष्यबळामुळे अनेक अडचणी येत असल्याचे एनएचएम कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, आधीच ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था यथातथाच असल्यामुळे; त्यातच या संबंधित ४४ कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आल्यामुळे पदावर सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण प्रचंड वाढणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. राष्ट्रीय आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्राच्या संचालकांनी केलेल्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.