आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nationalist Congress News In Marathi, Amravati Municipal Corporation

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणारी याचिका नवनियुक्त गटनेते सुनील काळे यांनी विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांच्याकडे सोमवारी (7 एप्रिल) दाखल केली. गटनेते अविनाश मार्डीकर, माजी उपमहापौर चेतन पवार, स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल व रिना नंदा आदी चार नगरसेवकांवर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.


नवनियुक्त गटनेते सुनील काळे व मिनी महापौर प्रवीण मेश्राम यांच्या वतीने अँड. र्शेयस वैष्णव व अँड. मिलिंद वैष्णव यांनी पक्षविरोधी कारवाई करणार्‍या नगरसेवकांचे पद रद्द करणारी याचिका विभागीय आयुक्तांकडे दाखल केली. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून चार नगरसेवकांना नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे. नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीमध्ये वादळ निर्माण झाले. संजय खोडके यांची प्रदेश महासचिव पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर महापालिकेतील नगरसेवकांचा राष्ट्रवादी फ्रंट त्यांच्या बाजूनेच राहिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहिल्याच सभेत लोकसभेचे नामांकन दाखल करण्याच्या दिवशी कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी शहराध्यक्ष अँड. किशोर शेळके यांची हकालपट्टी करत नितीन हिवसे यांची वर्णी लावली. कार्याध्यक्ष म्हणून चंद्रशेखर देशमुख तर महापालिकेतील गटनेते म्हणून सुनील काळे यांची नियुक्ती केली. त्यामुळे महापालिकेतील राष्ट्रवादीची दोन गटांत विभागली गेली असून, नगरसेवक दोन गटांमध्ये विभागले गेले आहे. राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले अविनाश मार्डीकर, चेतन पवार, मिलिंद बांबल व रिना नंदा खुलेपणाने नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये प्रचार करत असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात प्रचार करत असल्याने पक्षविरोधी कारवाई म्हणून चौघांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी याचिकेमध्ये करण्यात आली आहे.