आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपत्तीशी दोन हात करण्यास 60 कर्मचारी झालेत सज्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तीशी दोन हात करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथकातील सदस्यांना प्रादेशिक आणीबाणी कक्षात ‘आपत्ती’ व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले. मालखेड तलाव येथील रबर बोट प्रशिक्षणाने प्रशिक्षण वर्गाचा बुधवारी (दि. 11) समारोप होईल. विविध विभागांतील 60 कर्मचार्‍यांना हे प्रशिक्षण देण्यात आले.
आपत्ती व्यवस्थापनात उपयोगी कटर, हायड्रोलिक लिफ्टर, फायर एक्स्टिंग्विशर आदी उपकरणांबाबत माहिती देण्यात आली. महापालिकेच्या प्रादेशिक आणीबाणी कक्षात ऑस्ट्रेलियातून उपकरणे दाखल झाली आहेत. प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी कर्मचार्‍यांना या अत्याधुनिक उपकरणांचा उपयोग करता यावा, यासाठी प्रशिक्षित करण्यात आले. वॉलकट कम्पाउंडस्थित महापालिकेच्या अग्निशमन विभाग कार्यालयात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका उपायुक्त रामदास सिद्धभट्टी यांनी आपत्ती काळात येणारे अनुभव कथन करून कर्मचार्‍यांना त्या अनुभवांनी समृद्ध केले. होमगार्ड समादेशक एम. एच. रहनान यांनी आपत्ती व्यवस्थापनात बचाव पथकाच्या भूमिकेबाबत मार्गदर्शन केले. होमगार्डचे राजेंद्र बनसोड यांनीही मार्गदर्शन केले. प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाला उपायुक्त रामदास सिद्धभट्टी, रमेश मवासी, सहायक आयुक्त राहूल ओगले, होमगार्ड समादेशक एम. एच. रहमान, समन्वयक संदीप देशमुख, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, कार्यकारी अभियंता अनंत पोतदार, पी. एम. देशमुख, अशोक देशमुख, भास्कर तिरपुडे, दिलीप पडघन, डॉ. देवेंद्र गुल्हाने, डॉ. अजय जाधव, मुख्य लेखाधिकारी शैलेंद्र गोसावी, पशु शल्य चिकित्सक डॉ. सचिन बोंद्रे आदी उपस्थित होते.