अमरावती - निसर्गाकडून मानवाला अनमोल खजिना मिळाला आहे. फुले तर या खजिन्यात वेगळीच भर घालत असतात. रंगीबेरंगी, वेगवेगळ्या आकारप्रकारांतील, विविध जातींतील फुले मनाला सदैव मोहिनी घालत असतात. विद्यापीठ मार्गावरील डॉ. उर्मी शाह यांच्या अंगणातील बगीचादेखील येणार्या-जाणार्याला आकर्षित करत आहे. लीली, ऑर्किड, यासह विविध प्रकारची फुले येथे डौलाने उभी आहेत. छाया : शेखर जोशी