आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Navneet Kaur Rana News In Marathi, Nationalist Congress, Ajit Pawar

आरोप-प्रत्यारोपाने गाजला होळीचा दिवस; अडसूळ-राणा वाद पोलिसांत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवार नवनीत कौर-राणा यांनी केलेले आरोप धादांत खोटे आहेत. या प्रकरणी वृत्तवाहिनीने केलेले चित्रीकरण तपासावे. या सार्‍या प्रकरणामागे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी केला. नवनीत राणा यांनी तक्रार दाखल केल्यानंतर रविवारी दुपारी पत्रकार परिषदत घेत अडसूळ यांनी त्यांचे म्हणणे मांडले.


चित्रीकरणातून राणा यांनी केलेल्या आरोपांची शहानिशा करून पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी अडसूळ यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत माजी खासदार अनंत गुढे, आमदार प्रवीण पोटे, अभिजित अडसूळ, भाजपचे तुषार भारतीय, किरण महल्ले, निवेदिता चौधरी, सुधीर सूर्यवंशी, डॉ. राजेंद्र तायडे, दिनेश नाना वानखडे यांच्यासह शिवसेना-भाजप महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.


शिवसेना महिलांचा सन्मान राखते, असे सांगत अडसूळ म्हणाले, की वृत्तवाहिनीचे चित्रीकरण हा महत्त्वाचा पुरावा आहे. चारित्र्याहिनतेचे आरोप केले असतील, तर ते चित्रफितीतून स्पष्ट होईलच. तेव्हा वृत्तवाहिनीचे चित्रीकरण पोलिसांनी जप्त करावे, अशी मागणीही त्यांनी केली.


राणा यांनी दिली तक्रार
नवनीत राणा यांनी गाडगेनगर ठाण्यात येऊन खासदार अडसुळांसह 10 ते 14 शिवसैनिकांविरुद्ध तक्रार दिली होती. या वेळी ठाण्याबाहेरील वातावरण तापल्यामुळे पोलिसांनी राखीव पोलिस दल, राज्य राखीव पोलिस दलाचे प्लॅटून येथे तैनात केले होते. ठाण्याबाहेर संतप्त राणा सर्मथकांनी अडसूळ यांच्याविरोधात नारेबाजी केली. ठाण्यात नवनीत राणा यांच्यासोबत मेघा हरणे, ज्योती सैरिसे, विनोद गुहे, नितीन बोरेकर, अंबादास जावरे, राजेश शिरभाते यांच्यासह असंख्य राणा सर्मथक