आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Navneet Rana News In Marathi, Amravati Lok Sabha Constituncy, NCP

नवनीत राणा यांच्या तक्रार प्रकरणी पोलिसांना हवा आणखी कालावधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - अमरावती लोकसभा मतदार संघाच्या राकाँच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांमुळे पोलिसांनी खासदार अडसूळ व त्यांच्या 10 ते 12 सर्मथकांविरुद्ध महिनाभरापूर्वी गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणाच्या तपासासाठी अजून 15 दिवसांचा वेळ मिळावा, अशी मागणी पोलिस न्यायालयाला करणार आहे.


16 मार्च 2014 रोजी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाप्रसंगी आनंदराव अडसूळ, नवनीत राणा यांच्यात वाद झाला होता. यानंतर राणा यांनी गाडगेनगर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी खासदार अडसूळ, प्रकाश मंजलवार आणि नितीन तारेकर यांच्यासह 10 ते 12 जणांविरुद्ध विनयभंग, अश्लील शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अडसूळ वगळता त्यांच्या इतर सहकार्‍यांविरुद्ध अँट्रॉसिटी अँक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा एक महिन्यात तपास करण्यात येणार असल्याचे त्या वेळी पोलिसांनी सांगितले होते. हा तपास पूर्ण करण्यासाठी आणखी पंधरा दिवसांचा कालावधी वाढवून देण्याची मागणी अर्जाद्वारे न्यायालयाकडे करण्यात येणार आहे.


तपास अंतिम टप्प्यात
खासदार अडसूळ व त्यांच्या सर्मथकांविरुद्ध असलेल्या प्रकरणांचा तपास अंतिम टप्प्यात आहे. आणखी पंधरा दिवसांचा तपासासाठी वेळ मिळावा, अशी मागणी आम्ही न्यायालयाकडे करणार आहे. सोमनाथ घार्गे, पोलिस उपायुक्त.