आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Navneet Rana News In Marathi, Amravati, Nationalist Congress

नवनीत राणा यांच्या कारची काच अज्ञात व्यक्तीनी फोडली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - राष्‍ट्रवादीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या कारची काच अज्ञात व्यक्तीने फोडल्याचे बुधवारी सकाळी उघड झाले. चार महिन्यांपूर्वीच खरेदी केलेली इनोव्हा कार (एमएच 31 इए 9802) नवनीत राणा वापरतात. मंगळवारी रात्री चालक बबलू मेश्राम यांनी राणा यांच्या निवासस्थानापुढे कार उभी केली.

बुधवारी सकाळी पाहणी केली असता, कारच्या मागच्या बाजूची काच फोडल्याचे त्यांना आढळले. हा प्रकार घडला तेव्हा आमदार रवी राणा व नवनीत राणा शहरात नव्हते. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी आले. नवनीत राणा यांना राष्‍ट्रवादीकडून उमेदवारी मिळाल्याने विरोधकांच्या पोटात खुपते आहे. त्यांनी चालवलेला हा खोडसाळपणा असल्याचे आमदार राणा म्हणाले.