आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Navneet Rana News In Marathi, Nationalist Congress, Anandrao Adsul, Divya Marathi

अडसूळ-नवनीत राणा आले आमने-सामने,दोघांच्याही सर्मथकांची केली जोरदार घोषणाबाजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - विद्यमान खासदार आणि लोकसभेसाठी शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवार नवनीत राणा शनिवारी पहिल्यांदाच एकमेकांसमोर आले. निमित्त होते, एका खासगी वृत्तवाहिनीच्या निवडणूकविषयक कार्यक्रमाचे.
शहरातील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रांगणात या वृत्तवाहिनीने सर्वपक्षीय उमेदवारांना एकत्र बोलावून त्यांच्याशी संवाद साधला. त्यामध्ये आम आदमी पार्टीच्या उमेदवार प्रा. भावना वासनिकदेखील सहभागी झाल्या होत्या. निवडणूक घोषित झाल्यापासून जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या या तगड्या उमेदवारांवर आहे. विशेष म्हणजे, एरवी प्रसार माध्यमांच्या आणि जाहीर सभांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे अडसूळ आणि नवनीत राणा यांना वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीसमोर एकत्रितपणे मुलाखत देतानाचे हे दृश्य सर्वसामान्य अमरावतीकरांसाठी औत्सुक्याचा विषय ठरला. दोघांनीही एकमेकांच्या कार्यपद्धतीवर टीकाटिप्पणी करीत अनेक आक्षेप नोंदवले. कार्यकर्ते व नागरिकांनीही हा संवाद ऐकण्यासाठी मोठी गर्दी केली होती. एकमेकांच्या विरोधातील वक्तव्यावर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. काही काळ ताणतणावाचे प्रसंगदेखील आले. मात्र, अखेर वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाचा र्मयादित कालावधी संपला आणि मुलाखतीचा कार्यक्रम आटोपता घेण्यात आला. कार्यक्रम स्थळाहून निघताना आनंदराव अडसूळ आणि नवनीत राणा यांनी एकमेकांना आदरपूर्वक नमस्कारही केला.