आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Navneet Rana News In Marathi, Nationalist Congress, NCP

नवनीत राणा यांचे यादीतील नाव फोटोसह गवसले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नवनीत राणा यांचे नाव मतदार यादीत सापडत नसल्याचा मुद्दा सोमवारी निकाली निघाला. आमदार रवि राणा यांनी नवनीत यांचे नाव यादीत असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार, अधिकार्‍यांना पुरवणी यादीत 1167 अनुक्रमांकावर राणा यांचे नाव व फोटो सापडला.


निवडणूक विभागाने उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्याकडे तसेच इंटरनेटवरील अधिकृत वेबसाइटवर अमरावती लोकसभा मतदारसंघाची यादी उपलब्ध केली आहे. उपलब्ध असलेल्या यादीत केवळ 1120 अनुक्रमांकापर्यंतचीच नावे नमूद होती. त्यामुळे त्यापुढची नावे कुठे आहेत, असा प्रश्न उपस्थित झाला होता. राणा यांनी दाखल केलेल्या आपल्या दुसर्‍या नामांकन अर्जात त्यांचे नाव बडनेरा मतदारसंघातील भाग क्रमांक 153 मधील अनुक्रमांक 1167 वर असल्याचे नमूद केले होते. पहिल्या नामांकनातील अनुक्रमांकाचा रकाना रिकामाच होता. त्यातच निवडणूक आयोगाने दिलेल्या यादीत 1120 क्रमांकापर्यंतचीच नावे उपलब्ध होती. त्यामुळे राणा यांचे नाव यादीतून गेले कुठे, यामागे काही चुकीचे तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत होता. ‘दिव्य मराठी’ने या बाबत वृत्त प्रकाशित केले. त्यामुळे अधिकारी व राणा यांनीही यादीची पुन्हा माहिती घेतली. त्यात निवडणूक विभागाजवळ जी फोटोसह यादी उपलब्ध आहे, त्यात राणा यांचे नाव फोटोसह सापडले आहे. अद्ययावत यादी जी जिल्हा प्रशासनाजवळ आहे, ती निवडणूक विभागाने छापील स्वरूपात व वेबसाइटवर उपलब्ध केली नाही. त्यामुळे गोंधळ झाला असावा, असे बोलले जात आहे.