आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबा-एकवीरा देवीला साडेतीन हजार किलो सुका मेव्याचा प्रसाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - विदर्भातील हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अंबादेवी, एकवीरा देवी मंदिरांत यंदाच्या नवरात्रोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. यंदा नवमीच्या दिवशी तीन हजार पाचशे किलो सुका मेवा प्रसादाचे भक्तांना वितरण करण्यात येणार आहे. प्रतिपदेपासून प्रसादासाठी सुका मेवा संकलनाची सुरुवात होणार आहे. अंबादेवी आरती मंडळाचे सदस्य दरवर्षी यासाठी परिश्रम घेतात. खारीक, बदाम, काजू, किसमिस, पिस्ता, अक्रोड, गोळंबी आदी पदार्थांचे मिश्रण असलेल्या प्रसादाचे मंदिरात दरवर्षी नवमीला भक्तांना वितरण करण्यात येते. अंबादेवी आरती मंडळाचे सदस्य सुमारे बारा वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबवत आहेत. मातेच्या भािवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रसाद संकलनाला दरवर्षी लाभतो.

९११ रुपयांच्या प्रसाद वितरणापासून मंडळाने या उपक्रमाला सुरुवात केली होती. काही वर्षांतच भाविकांचा त्याला भक्कम प्रतिसाद लाभला. दरवर्षी अष्टमीच्या रात्री भाविकांकडून संकलित सुका मेव्याचा प्रसाद बनवायला सुरुवात होते. सुमारे चारशे लोक प्रसादाच्या पुड्याची पॅकिंग करतात. नवमीच्या दिवशी सकाळी आणि सायंकाळी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भािवकांना प्रसादाचे वितरण केले जाते.

दरवर्षी शेकडो भक्त स्वखुशीने प्रसादासाठी सुका मेवा देतात. आरती मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ गावंडे, सचिव अभय बपोरीकर यांच्यासह पदाधिकारी या उपक्रमासाठी परिश्रम घेत आहेत.

हजारो भाविक घेतात प्रसादाचा लाभ
प्रसादासाठीसुका मेवा संकलनाला काही दिवसांतच सुरुवात होणार आहे. मागच्या वर्षी प्रसादाची चाळीस हजार पािकटे केली होती. यंदा तीन हजार पाचशे किलोंचा प्रसाद राहणार आहे. एवढ्या मोठ्या प्रसादाचा नैवेद्य मातेला दाखवला जाणार आहे. हजारो भािवक दरवर्षी प्रसादाचा लाभ घेतात. इंदूर, उजैन, दुबईसह नोकरीनिमित्त विविध शहरांत असलेले भाविक नवरात्रीला अंबानगरीत दाखल होतात. अभयबपोरीकर, सचिव,अंबादेवी आरती मंडळ, अंबादेवी देवस्थान, अमरावती.
मंडळाच्या आरतीला शंभर वर्षांची परंपरा
अंबादेवी आरती मंडळाला प्राचीन परंपरा आहे. दरवर्षी नवरात्रात रात्री अकरा ते एक या वेळेत मंडळाचे सदस्य अंबादेवीची आरती करतात. त्यानंतर रात्री तीन वाजेपर्यंत एकवीरामातेची आरती केली जाते. शंभर वर्षांहून अधिक जुनी ही परंपरा असल्याचे सचिव अभय बपोरीकर यांनी सांगितले. देवींच्या तीनशे आरतींचा संग्रह मंडळाकडे आहे. सुमारे अडीचशे भाविक नवरात्रात दररोज मंदिरात आरतीसाठी एकत्र येतात.