आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंबा बैसली सिंहासनी हो...! संस्थानतर्फे सुरक्षेची विशेष खबरदारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री एकवीरा, श्री अंबादेवी संस्थान येथे यंदाही नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरांची रंगरंगोटी, सजावट पूर्ण झाली असून, दर्शनासाठी भाविकांची गर्दी नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला पाहावयास मिळाली.
गुरुवारी पहाटेपासून दोनही मंदिरांमध्ये उत्सवाला धडाक्यात सुरुवात होणार आहे. विदर्भाचे आराध्यदैवत अंबा, एकवीरामातेच्या मंदिरांत भािवक नवरात्रोत्सवनिमित्त मोठ्या संख्येने जमतात. भाविकांच्या उपस्थितीने दरवर्षी हा परिसर फुलून निघतो. नेहमीप्रमाणे यंदाही येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. श्री अंबामातेच्या मंदिरात गुरुवारी पहाटे साडेपाच वाजतापासून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. प्रथम घटस्थापना करण्यात येईल. त्यानंतर सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण होणार आहे. साडेअकरानंतर महानैवेद्य, आरती होणार आहे. अंबादेवी आरती मंडळातर्फे रात्री दहा ते एक वाजेपर्यंत महाआरती होणार आहे. या उत्सवात आठही दिवस महाप्रसाद, भजनी मंडळांचे कार्यक्रम, प्रवचन विविध धार्मिक कार्यक्रम साजरे होणार आहेत. खास करून नवरात्रोत्सवात विदर्भातील विविध जिल्ह्यांतील भाविक अंबा, एकवीरामातेच्या दर्शनासाठी येत असतात. भजनं, आरत्या भाविकांच्या गर्दीने संपूर्ण उत्सवात भक्तिमय वातावरण पाहायला मिळते.
सुरक्षेसाठी घेण्यात आली दक्षता दरवर्षी अंबादेवी, एकवीरामातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता, संस्थानतर्फे सुरक्षेची विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, दर्शनासाठी स्वतंत्र बारी, होमगार्ड पथक, सुरक्षा रक्षक आदी सुविधा येथे आहेत. पोलिस प्रशासनाने पाहणी करून सुरक्षेविषयक दिलेल्या सर्व सूचनांचे पालन येथे करण्यात येणार असल्याची मािहती सूत्रांनी दिली. मंदिराच्या स्वयंसेवकांचेही येथे येणाऱ्यांच्या हालचालीवर बारीक लक्ष राहणार आहे. मंदिराच्या परिसरामध्ये चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी दुर्गोत्सव मंडळ पदाधिका-यांची दिवसभर लगबग होती.