आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीमध्‍ये राकाँचे नवे जिल्हाध्यक्ष लवकरच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - विजयराव भैसे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त होणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी दोन-तीन दिवसांत नियुक्ती करण्यात येणार असल्याचे पक्षाचे संपर्कप्रमुख अनिल देशमुख यांनी रविवारी सांगितले.
अकोला येथील कार्यकर्ता बैठकीला जाताना वाटेत देशमुख यांनी अमरावतीत दुपारचे जेवण घेतले. या वेळी पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी चर्चेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जिल्हाध्यक्षपदासाठी अनेकांनी इच्छा व्यक्त केली. गेल्या बैठकीतच या सर्वांशी बोलणी झाली. तो अहवाल सध्या पक्षर्शेष्ठींकडे आहे. लोकसभा निवडणुकीतील प्रतिसाद बघता काँग्रेस-राष्ट्रवादी ‘फिफ्टी-फिफ्टी’ असे सूत्र पुढे आले आहे. त्यामुळे निम्म्या जागा राष्ट्रवादीला मिळाव्यात, असा प्रयत्न सुरू आहे. शेवटी जागावाटप आणि मतदारसंघांची अदलाबदल याबाबतचा अंतिम निर्णय पक्षर्शेष्ठीच घेतील, असेही ते म्हणाले.
इच्छुकांची लांबलचक यादी

माजी जिल्हाध्यक्ष अरुण पाटील गावंडे, भातकुली पंचायत समितीचे उपसभापती अजिज पटेल, विजय काळे, अनिल ठाकरे, रवींद्र गायगोले, रायुकाँचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत आदी इच्छुक आहेत.