आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रमय पुस्तिकेद्वारे जादूटोणाविरोधी कायद्याचा जिल्ह्यात होतोय प्रचार

7 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक

अमरावती- नरबळी, अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी 2013 मध्ये राज्य विधिमंडळाने कायदा पारित केला. या कायद्याचा प्रचार, प्रसार करण्याच्या दृष्टीने संपूर्ण राज्यात या कायद्याची चित्रमय पुस्तिका मोफत वितरित करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या सहकार्यातून पंचायत समिती स्तरावरून पुस्तिकांचे वितरण सुरू झाले आहे. महाराष्ट्र अंधर्शद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा र्याध्यक्ष श्रीकृष्ण धोटे पुस्तक वाटपाचा हा उपक्रम राबवत आहेत.

याला कायद्याने बंदी.

 • भूत, भानामतीवरील विश्वासातून बळजोरीने अघोरी उपाय योजणे.
 • तथाकथित चमत्कारातून आर्थिक प्राप्ती, फसवणूक, दहशत पसरवणे.
 • अलौकिक शक्तीच्या हव्यासापोटी अघोरी प्रथांचा अवलंब करणे व त्याचे उदात्तीकरण करणे.
 • करणी, भानामती, जादूटोण्याची भीती दाखवून अमानुष कृत्य व नरबळी देणे.
 • अतिंद्रिय शक्तीचा शरीरातील संचाराचा दावा करून भीती, धमकी व फसवणूक करणे.
 • विशिष्ट व्यक्तीवर करणी, जादूटोण्याचा आरोप करून तिला सैतान ठरवणे व तिचे जगणे असह्य करणे.
 • चेटूक केल्याचा आरोप करून नग्नावस्थेत धिंड काढणे, मारहाण व समाजातून बाहेर काढणे.
 • मंत्र-तंत्राद्वारे भूत-पिशाच्चांना आवाहन केल्याचा आभास निर्माण करून घबराट पसरवणे व अघोरी कृत्य करण्यास भाग पाडणे.
 • साप, विंचू चावल्यास वैद्यकीय उपचारापासून परावृत्त करून मंत्र-तंत्र, गंडे-दोरे यांचा अवलंब करणे.
 • रक्तविरहित शस्त्रक्रियेचा आभास निर्माण करून लिंग बदलाचा वा इतर उपचारांचा दावा करणे.
 • अलौकिक शक्तीच्या आभासातून पुत्रप्राप्तीचे आमिष दाखवणे. पवित्र आत्मा, पुनर्जन्म या आभासातून लैंगिक शोषण करणे.
 • मानसिक विकलांग व्यक्तीला अलौकिकता बहाल करण्याचा बनाव करून फसवणूक करणे.