आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Need For Out Of School Students In Education Stream

शाळाबाह्य मुलांना प्रवाहात आणावे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( प्रगणकांच्या एक दिवसीय कार्यशाळेला उपस्थित शिक्षक व पालक )
परतवाडा - ते१४ वर्षे वयोगटातील बालकांची पटावर नोंदणी आवश्यक आहे. याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण यावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. एक दिवसीय सर्वेक्षण जुलैला होणार आहे. त्यासाठी स्थानिक कल्याण मंडपम येथे बुधवारी (दि. १) प्रगणकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
तळागाळातील प्रत्येक मुलगा-मुलगी शिक्षणाच्या प्रवाहात यावी, त्यांना शिक्षणाचा हक्क मिळावा, यासाठी शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्या अनुषंगाने अचलपूर तालुक्यातील शाळाबाह्य बालकांच्या शोधासाठी प्रगणकांची कार्यशाळा घेण्यात आली. तहसीलदार मनोज लोणारकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सभेला प्रभारी गट शिक्षणाधिकारी एस. बी. भुस्कटे, सुभाष बोचरे, नगर परिषदेचे शिक्षण प्रशासन अधिकारी संजय तडोकार, विस्तार अधिकारी उज्ज्वला काटपातर, जुल्फेकार शहा प्रामुख्याने उपस्थित होते. अचलपूर तालुक्यातील ५८ हजार ८१७ कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी ५०० प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली असून ३१ झोनल अधिकारी, दोन नियंत्रक अधिकारी, ५० राखीव कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. कार्यशाळेतून प्रशिक्षण देऊन जुलै रोजी प्रत्येक शाळेत १०० टक्के विद्यार्थी हजर ठेवणे सक्तीचे केले आहे. विद्यार्थी गैरहजर असल्यास मुख्याध्यापकाने तशी सुची सर्वेक्षण अधिकाऱ्याला देणे बंधनकारक आहे.

येथे होईल सर्वेक्षण
प्रत्येकघर, बाजार, वीटभट्ट्या, गुऱ्हाडघर, गावा बाहेरची पाल, दगड खाणी, बसस्टॉप, रेल्वे स्टेशन, रेड लाईट एरिया, भीक मागणारे स्थळ, तमाशा, शेती वस्ती अशा सर्व ठिकाणी शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
निवडणूक पल्स पोलिओच्या धर्तीवर या सर्वेक्षणात गणना करण्यात आलेल्या बालकांच्या डाव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्यात येणार आहे. यासाठी सर्वेक्षण करणाऱ्याच्या सोबतीला एक कर्मचारी राहणार आहे. त्यामुळे एकही बालक सुटणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे.
प्रगणकांच्या एक दिवसीय कार्यशाळेला शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.