आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदीजी, पहिल्यांदा नेट पॅक स्वस्त करा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- ‘मोदी साहेब, पहिल्यांदा नेट पॅक स्वस्त करा राव. एवढा प्रचार केला आम्ही.’ अशी मागणी तरुणाईने खुद्द देशाचे नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. व्हॉट्सअँप आणि फेसबूकवर यासह विविध मागण्यांचे रंजक मॅसेज आणि ग्राफिक्स झळकत आहेत. ‘मोदी साहेब’ या मागण्यांना कितपत न्याय देतात, याकडे आता तरुणाईचे लक्ष लागले आहे.
सोशल मीडियावरील सद्य:स्थितीत सर्वाधिक लोकप्रिय नाव म्हणजे नरेंद्र मोदी. देशातील लाखो मोदी सर्मथक युवकांनी फेसबूक, व्हॉट्सअँप, ट्विटरसारख्या विविध माध्यमांचा आधार घेत मोदी यांचा धूमधडाक्यात प्रचार केला. प्रचाराच्या आखाड्यात अग्रेसर असलेला हा उमेदवार निवडणुकीत विजयी होऊन पंतप्रधानपदावर विराजमान होत आहे. ‘मोदी साहेबां’नी आता सर्व नव्हे, माफक अपेक्षा पूर्ण कराव्यात, अशी इच्छा सोशल मीडियाच्या माध्यमाने तरुणाई व्यक्त करीत आहे. या अपेक्षांवर विविध ‘कमेंट्स’ पास होत आहेत, त्यावर चर्चाही झडत आहे.

विद्यार्थी, तरुणांना विविध विषयांची माहिती इंटरनेटद्वारे घेता यावी, नवमाध्यमांच्या लाभांपासून तरुण वंचित राहू नये, या दृष्टीने इंटरनेट सेवा सर्वांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी नेट पॅक स्वस्त होणे गरजेचे आहे, अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया युवकांनी दिल्या आहेत. याशिवाय माहितीच्या महाजलावर मिळणारी नित्य नवीन माहिती घेता यावी म्हणून युवकांनी संकेत स्थळांशी जुळावे, अशा प्रतिक्रियाही मिळाल्या आहेत.